विराट कोहलीच्या नावावर १२ सामन्यांमध्ये ७०.४४ च्या सरासरीने ६३४ धावा आहेत. विराट कोहलीने ऋतुराज गायकवाडला मागे टाकले आहे. ऋतुराज गायकवाडने ११ सामन्यात ६०.११ च्या सरासरीने ५४१ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्यातील अंतर ९३ धावांचे झाले आहे.
(PTI)कोहलीला या फलंदाजांकडून स्पर्धा - विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा ट्रॅव्हिस हेड तिसऱ्या स्थानावर आहे. ट्रॅव्हिस हेडने ११ सामन्यांत ५३.३० च्या सरासरीने ५३३ धावा केल्या आहेत.
(PBKS-X)तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर ११ सामन्यांत ६७.२९ च्या सरासरीने ४७१ धावा आहेत. त्याचबरोबर या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या सुनील नरेनने ११ सामन्यांत ४१.९१ च्या सरासरीने ४६१ धावा केल्या आहेत.
(ANI)हर्षल पटेलने पर्पल कॅपच्या शर्यतीत बुमराहला मागे टाकले - त्याचवेळी हर्षल पटेलने पर्पल कॅपच्या शर्यतीत जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. हर्षल पटेलने १२ सामन्यांत २० बळी घेत अव्वल स्थान गाठले आहे. अशा प्रकारे जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
(PTI)जसप्रीत बुमराहच्या नावावर १२ सामन्यात १६.५० च्या सरासरीने १८ विकेट आहेत. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांनी १६-१६ विकेट्स घेतल्या आहेत.
(AFP)