KKR vs MI Head to Head : आज २५० धावांचा पाऊस पडणार? ईडन गार्डनवर केकेआर-मुंबई भिडणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs MI Head to Head : आज २५० धावांचा पाऊस पडणार? ईडन गार्डनवर केकेआर-मुंबई भिडणार

KKR vs MI Head to Head : आज २५० धावांचा पाऊस पडणार? ईडन गार्डनवर केकेआर-मुंबई भिडणार

May 11, 2024 10:44 AM IST

kkr vs mi head to head record : कोलकाता आणि मुंबई (KKR vs MI) यांच्यातील सामना ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व आहे.

KKR vs MI Head to Head : आज २५० धावांचा पाऊस पडणार? ईडन गार्डनवर केकेआर-मुंबई भिडणार
KKR vs MI Head to Head : आज २५० धावांचा पाऊस पडणार? ईडन गार्डनवर केकेआर-मुंबई भिडणार (IPL)

आयपीएल २०२४ मध्ये आज (११ मे) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स भिडणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या सेनेकडे आता गमावण्यासारखं काही उरलेलं नाही, कारण ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. 

दुसरीकडे, KKR टॉप चारमध्ये आपले स्थान फिक्स करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. गेल्या सामन्यात संघाने लखनौच्या नवाबांचा ९८ धावांनी पराभव केला होता.

ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी असेल?

कोलकाता आणि मुंबई (KKR vs MI) यांच्यातील सामना ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व आहे. वेगवान आउटफिल्डमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सहज जातो. खेळपट्टीवर चांगली उसळीही असते, त्यामुळे चेंडू बॅटवर चांगला येतो. यंदाच्या मोसमातही ईडन गार्डन्सच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडला आहे.

आकडे काय सांगतात?

ईडन गार्डन्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ९२ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ३७ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर ५५ सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. याच मैदानावर केकेआरविरुद्ध खेळताना पंजाबने २६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून इतिहास रचला होता.

केकेआर वि. मुंबई हेड टू हेड

कोलकाता आणि मुंबई यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध ३३आयपीएल सामने खेळले आहेत. KKR ने १०, तर MI ने २३ जिंकले आहेत. केकेआरची मुंबईविरुद्धची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या २३२ आहे. मुंबई इंडियन्सची नाईट रायडर्सविरुद्ध सर्वोच्च धावसंख्य २१० धावा आहे.

केकेआरप्ले ऑफच्या उंबरठ्यावर 

कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या तिकीटापासून फक्त एक विजय दूर आहे. या हंगामात संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ८ सामन्यात संघाने विजय मिळवला आहे, तर संघाला केवळ ३ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लखनौविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात संघाची कामगिरी दमदार होती. सुनील नरेनने फलंदाजीत आपले कौशल्य दाखवले होते, तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने चेंडूने प्रभावी कामगिरी केली होती.

Whats_app_banner