इंडियन प्रीमियर लीग २२०४ च्या ५९व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३५ धावांनी पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १० मे (शुक्रवार) झालेल्या या सामन्यात गुजरातने सीएसकेला विजयासाठी २३२ धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना सीएसके ८ विकेट्सवर १९६ धावाच करू शकले.
गुजरात टायटन्सचा चालू मोसमातील १२ सामन्यांमधला हा पाचवा विजय असून प्लेऑफमध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा अजूनही कायम आहेत. दुसरीकडे, पाच वेळच्या चॅम्पियन सीएसकेचा १२ सामन्यांमधला हा सहावा पराभव ठरला.
चेन्नईसाठी या सामन्यात डॅरिल मिशेलने ३४ चेंडूत सर्वाधिक ६३ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तर मोईन अलीने ५६ धावांची खेळी केली. मोईनने ३६ चेंडूंच्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. धोनीने ११ चेंडूत ३ षटकार आणि एक चौकारासह नाबाद २६ धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्माने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर राशिद खानने दोन विकेट मिळवले.
गुजरताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून २३१ धावा केल्या होत्या. साई सुदर्शन ५१ चेंडूत १०३ धावा करून बाद झाला तर शुभमन गिल ५५ चेंडूत १०४ धावा करून बाद झाला. सुदर्शनने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. तर गिलच्या बॅटमधून ९ चौकार आणि ५ षटकार आले.