मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli Record: पंजाब किंग्जविरुद्ध विराटचा पराक्रम; धवनला मागे टाकत धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

Virat Kohli Record: पंजाब किंग्जविरुद्ध विराटचा पराक्रम; धवनला मागे टाकत धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 26, 2024 05:38 PM IST

Virat Kohli breaks Shikhar Dhawan record: आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला आहे.

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने भारताचा सलामीवीर शिखर धवनचा विक्रम मोडित काढला आहे. याशिवाय माजी क्रिकेटपटू धोनीच्या विक्रमाशी बरोबरो साधली.
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने भारताचा सलामीवीर शिखर धवनचा विक्रम मोडित काढला आहे. याशिवाय माजी क्रिकेटपटू धोनीच्या विक्रमाशी बरोबरो साधली.

Virat Kohli Equals MS Dhoni Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात काल आयपीएलचा सहावा सामना खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात आरसीबीने पंजाबचा चार विकेट्सने पराभव केला. आरसीबीच्या विजयात विराट कोहलीचा सिंहाचा वाटा उचलला. याशिवाय, त्याने पंजाबचा कर्णधार शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला. तसेच चेन्नई सुपरकिंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या खास विक्रमाशी बरोबरी साधली.

ट्रेंडिंग न्यूज

पंजाबविरुद्ध सामन्यात ७७ धावांची खेळी करत विराट कोहलीने ५१ अर्धशतकांचा आकडा गाठला. या कामगिरीसह आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. हा विक्रम आधी शिखर धवनच्या नावावर होता. शिखर धवनने या स्पर्धेत आतापर्यंत ५० अर्धशतके नोंदवली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर विराट कोहलीचा दुसऱ्या क्रमांक आहे. या यादीत शिखर धवन (५० अर्धशतके) तिसऱ्या, रोहित शर्मा (४२ अर्धशतक) चौथ्या आणि एबी डिव्हिलियर्स ४० अर्धशतकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

 

आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके

१) डेव्हिड वॉर्नर– ६१

२) विराट कोहली– ५१

३) शिखर धवन– ५०

४) रोहित शर्मा– ४२

५) एबी डिव्हिलियर्स– ४०

 

धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

पंजाबविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने धोनीच्या खास विक्रमाशी बरोबरी साधली आहे. या स्पर्धेत धोनीने १७ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला. पंजाबविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकावून सामनावीराचा पुरस्कार जिंकला. यासह त्याने आयपीएलमध्ये सतराव्यांदा पुरस्कार जिंकला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूच्या यादीत एबी डिव्हिलियर्स अव्वल स्थानी आहे. त्याने २५ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला. त्यानंतर ख्रिस गेल (२२), रोहित शर्मा १९, डेव्हिड वॉर्नर (१८) आणि त्यानंतर विराट कोहली आणि धोनीचा क्रमांक लागतोपटकावला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकलेले खेळाडू-

१) एबी डिव्हिलियर्स- २५

२) ख्रिस गेल– २२

३) रोहित शर्मा– १९

४) डेव्हिड वॉर्नर– १८

५) विराट कोहली– १७

६) महेंद्रसिंग धोनी– १७

IPL_Entry_Point