IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले गेले. यावेळी आयपीएलमध्ये अनेक भाषांमध्ये कॉमेंट्री केली जात आहे. भोजपुरी भाषेतही कॉमेंट्री ऐकायला मिळत आहे. पंरतु, हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान भोजपुरी समालोचकाची अश्लील कॉमेंट्री ऐकून मैदानातील प्रेक्षकांना धक्काच बसला. या कॉमेंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या डावातील १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हेन्रिक क्लासेनने जबरदस्त षटकार मारला. कोलकाताचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर त्याने हा शॉट मारला. त्याचा फटका पाहून सर्वजण दंग झाले. मात्र, या षटकाराचे कौतुक करताना भोजपुरी समालोचकाने अश्लील कॉमेंट्री केली. या कॉमेंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला.
“अशा भाषेचा वापर करणाऱ्याला नोकरीवरून काढून टाकावे. इंडियन प्रीमियर लीग ही अशी गोष्ट आहे, जी कुटुंबातील बहुतेक सदस्य त्यांच्या जेवणाच्या टेबलावर एकत्र बसून पाहतात. जिओ सिनेमाने यावर कारवाई करावी”, अशी एका युजरने प्रतिक्रिया दिली.
दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, "भोजपुरीमध्ये कॉमेंट्री करणारा माणूस कोण आहे? भोजपुरीत काय मूर्खपणा चालला आहे? भोजपुरी समालोचकांनी गांजाचे सेवन केले आहे का? सगळ्या जगासमोर तुमच्या भाषेचा अपमान होतोय आणि तुम्ही टाळ्या वाजवत आहात? कुठे गेला तुमचा स्वाभिमान? भोजपुरी गाण्यांची अश्लीलता आता क्रिकेट कॉमेंट्रीपर्यंत पोहोचली आहे आणि करोडो लोकांसमोर दाखवली गेली."
संबंधित बातम्या