Samir Rizvi Remove Cap: विराटशी हस्तांदोलन करताना समीर रिझवीनं स्वत:च्या डोक्यावरील टोपी का काढली? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Samir Rizvi Remove Cap: विराटशी हस्तांदोलन करताना समीर रिझवीनं स्वत:च्या डोक्यावरील टोपी का काढली? वाचा

Samir Rizvi Remove Cap: विराटशी हस्तांदोलन करताना समीर रिझवीनं स्वत:च्या डोक्यावरील टोपी का काढली? वाचा

Mar 26, 2024 11:33 AM IST

आरसीबीविरुद्ध सामना जिंकल्यानंतर चेन्नईचा युवा फलंदाज समीर रिझवीने विराट कोहलीशी हस्तांदोलन करताना स्वत:च्या डोक्यावरील टोपी काढली.

चेन्नईचा युवा फलंदाज समीर रिझवीने विराट कोहलीशी हात मिळवताना स्वत:च्या डोक्यावरील टोपी काढली.
चेन्नईचा युवा फलंदाज समीर रिझवीने विराट कोहलीशी हात मिळवताना स्वत:च्या डोक्यावरील टोपी काढली. (Instagram/X)

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा सहा विकेट्सने पराभव केला.  या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात चेन्नईचा युवा फलंदाज हा विराट कोहलीशी हात मिळवताना स्वत: च्या डोक्यावरील टोपी काढली.  हे पाहून मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे मन भरून आले.  सध्या सोशल मीडियावर समीर रिझवीच्या कृत्याचं कौतूक केले जात आहे.

भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या सतराव्या हंगामाची ब्लॉकबस्टर सुरुवात झाली. या लीगच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर दणदणीत विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसकेने आपल्या नव्या युगाची सुरुवात केली. माजी कर्णधार एमएस धोनीने घरच्या मैदानावर नाणेफेक गमावल्यानंतरही चेन्नईने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात धोनीबरोबरच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही पुनरागमन केले. तीन महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराटने जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान संघासाठी अखेरचा सामना खेळला होता.

CSK vs GT live streaming : चेन्नईचे 'सुपरकिंग्ज' आज गुजरातच्या 'टायटन्स'सोबत भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

विराट कोहली अनेकांसाठी आदर्श आहे. गेल्याच आठवड्यात वूमन प्रीमियर लीगमध्ये आरसीबी महिलांनी ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर संघाची गोलंदाज श्रेयांका पाटीलने कोहलीसोबतचा एक हृदयस्पर्शी क्षण शेअर केला होता.  चेन्नई आणि आरसीबीच्या सामन्यानंतर पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, कोहलीचा प्रभाव फ्रँचायझी प्रतिस्पर्ध्यांच्या पलीकडे आहे. सीएसकेने आरसीबीवर विजय मिळवल्यानंतर समीर रिझवीने विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या. तसेच सामन्यानंतर समीर रिझवीने विराट कोहलीशी हात मिळवताना आपली टोपी काढली. 

सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये भेटलेल्या कोहलीसोबतचा एक फोटो ही रिझवीने पोस्ट केला. या  फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने विराट कोहलीला 'फॉरएव्हर लेजेंड' असे संबोधित केले. कोहली इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ७ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज आहे. चेन्नईविरुद्ध सामन्यात त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने टी-२० क्रिकेटमधील १२ हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

चेन्नईविरुद्ध पराभवानंतर आरसीबीच्या संघाने पंजाबविरुद्ध सामन्यात चार विकेट्सने विजय मिळवत पुनरागमन केले.  आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत आरसीबीचा संघ दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपरकिंग्ज, गुजरात टायटन्स आणि कोलकता नाइट रायडर्स गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.

Whats_app_banner
विभाग