मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  वडील IPS अधिकारी तर मुलगा गोलंदाजांसाठी विलन... मुंबईकडून खेळलेला शशांक सिंग आहे तरी कोण? पाहा

वडील IPS अधिकारी तर मुलगा गोलंदाजांसाठी विलन... मुंबईकडून खेळलेला शशांक सिंग आहे तरी कोण? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 05, 2024 03:03 PM IST

Who is Shashank Singh : शशांक सिंग याचा जन्म छत्तीसगडमधील भिलाई येथे झाला. त्याचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे शशांक लहानपणी अनेक ठिकाणी राहिला आहे.

Who is Shashank Singh : वडील IPS तर मुलगा गोलंदाजांसाठी विलन... मुंबईकडून खेळलेला शशांक सिंग आहे तरी कोण? पाहा
Who is Shashank Singh : वडील IPS तर मुलगा गोलंदाजांसाठी विलन... मुंबईकडून खेळलेला शशांक सिंग आहे तरी कोण? पाहा (PTI)

आयपीएल २०२४ चा सतरावा सामना गुरुवारी (४ एप्रिल) गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना खूपच रोमहर्षक झाला. या सामन्यात शशांक सिंगने पंजाबला शेवटच्या षटकात थरारक विजय मिळवून दिला.

ट्रेंडिंग न्यूज

शशांक क्रीझवर आला तेव्हा पंजाबच्या विजयाची शक्यता ५ टक्क्यांहून कमी होती. गुजरातच्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजानबने ७० धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर शशांकने २९ चेंडूत नाबाद ६१ धावा करत संघाला विजयाकडे नेले. शशांकची ही मॅच विनिंग खेळी दीर्घकाळ स्मरणात राहील. 

शशांक सिंग कोण आहे?

अनेकजण शशांकला युवा खेळाडू मानतात पण तो ३२ वर्षांचा आहे. शशांक सिंग याचा जन्म छत्तीसगडमधील भिलाई येथे झाला. त्याचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे शशांक लहानपणी अनेक ठिकाणी राहिला आहे. जेव्हा त्याचे वडील जबलपूरमध्ये तैनात होते, तेव्हा तो तेथील क्रिकेट अकादमीत सामील झाला.

मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली नाही

त्यानंतर शशांक सिंग मुंबईला पोहोचला. तिथे त्याला क्रिकेट किती कठीण आहे याची जाणीव झाली. २०१५ मध्ये त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली.

फलंदाजीसोबतच ऑफ-स्पिन गोलंदाजी करणाऱ्या शशांकला ४ हंगामात मुंबईसाठी केवळ १५ टी-20 आणि ३ लिस्ट ए सामने खेळण्याची संधी मिळाली. यामुळे तो पुरता निराश झाला. संघातून आतबाहेर होत राहिल्यामुळे तो छत्तीसगडला परत गेला. त्याने २०१८-१९ हंगामात पुद्दुचेरीसाठी एक लिस्ट ए गेम देखील खेळला.

एकाच सामन्यात १५० धावा आणि ५ विकेट्स

छत्तीसगडमध्ये गेल्यानंतर शशांक सिंगला अधिक संधी मिळू लागल्या. त्याला प्रथम श्रेणीत पदार्पण करण्याची संधीही मिळाली. २०२३ मध्ये, त्याने विजय हजारे ट्रॉफी सामन्यात १५० हून अधिक धावा केल्या आणि ५ बळी घेतले. असे करणारा तो पहिला भारतीय आहे.

 शशांक सिंगचं क्रिकेट करिअर?

लिस्ट ए च्या ३० सामन्यांमध्ये शशांकने ४१ च्या सरासरीने आणि ११० च्या स्ट्राईक रेटने ९८६ धावा केल्या आहेत. त्याने २१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८५८ धावा केल्या आहेत. ५९ T20 मध्ये १४१ च्या स्ट्राईक रेटने ८१५ धावा केल्या. याशिवाय त्याच्या नावावर ६० विकेट्सची नोंद आहे.

IPL मध्ये ४ संघांचे प्रतिनिधित्व

शशांक आयपीएल २०१७ मध्ये दिल्ली संघात होता. त्यानंतर २०१९ ते २०२१ पर्यंत राजस्थान रॉयल्ससोबत राहिला. दोन्ही संघांनी त्याला खेळण्याची संधी दिली नाही. २०२२ च्या आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादमध्ये होता. त्याने लॉकी फर्ग्युसनविरुद्ध षटकारांची हॅटट्रिक केली होती. शशांकने आतापर्यंत IPL च्या ९ डावात १७४ च्या स्ट्राईक रेटने १६० धावा केल्या आहेत.

IPL_Entry_Point