Angkrish Raghuvanshi: कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्यानं आज दिल्लीच्या गोलंदाजीचं कंबरडं मोडलं!-who is angkrish raghuvanshi former u19 world cup star setting ipl 2024 on fire for kkr ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Angkrish Raghuvanshi: कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्यानं आज दिल्लीच्या गोलंदाजीचं कंबरडं मोडलं!

Angkrish Raghuvanshi: कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्यानं आज दिल्लीच्या गोलंदाजीचं कंबरडं मोडलं!

Apr 03, 2024 10:58 PM IST

Who Is Angkrish Raghuvanshi: कोलकात्याकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीने दिल्लीविरुद्ध सामन्यात वादळी अर्धशतक झळकावले.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अंगक्रिश रघुवंशीने अवघ्या २७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अंगक्रिश रघुवंशीने अवघ्या २७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या सोळाव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार ऑलराऊंडर सुनील नारायणने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. सुनील नारायणसह भारताचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी वादळी अर्धशतक झळकावून आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या २७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. ज्यात पाच चौकार आणि तीन गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे. रघुवंशीने आरसीबीविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र, आरसीबीविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

कोण आहे अंगक्रिश रघुवंशी?

आंगकृष्ण रघुवंशी यांचा जन्म ५ जून २००५ रोजी झाला. वयाच्या अकराव्या वर्षी तो क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत आला. अंगक्रिश रघुवंशी हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. याशिवाय, तो ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करू शकतो. अंडर १९ क्रिकेट विश्वचषकात त्याने जबरदस्त कामगिरीच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली. या स्पर्धेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. अंडर १९ एकदिवसीय विश्वचषकात त्याने ६ सामन्यात २७८ धावा केल्या होत्या.

अंगक्रिश रघुवंशीचे कुटुंब

अंगक्रिश रघुवंशी लहानपणापासूनच खेळाडू बनणे जवळजवळ निश्चित होते, कारण त्याची आई मलिका रघुवंशी यांनी बास्केटबॉलमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याचे वडील अवनीश यांनी आपल्या देशासाठी टेनिस खेळले आहे. त्याचा भाऊ क्रिशांग रघुवंशी हा देखील वडिलांप्रमाणे टेनिस खेळतो. याशिवाय, त्याच्या काकाने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी क्रिकेट खेळले आहे.

गुडगाव ते मुंबईपर्यंतचा प्रवास

अंगक्रिश रघुवंशीने गुडगावमध्ये प्रशिक्षक मन्सूर अली खान यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. काही काळानंतर, देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या अंगक्रिशच्या काकांनी त्याला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला, जिथे त्याला अभिषेक नायरच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. आयपीएलच्या लिलावात कोलकाताच्या संघाने अंगक्रिशला त्याची मूळ किंमत २० लाखात खरेदी केले.

 

कोलकात्याचे दिल्लीसमोर २७३ धावांचे लक्ष्य

विशाखापट्टणममध्ये खेळल्या जात असलेल्या दिल्ली विरुद्ध सामन्यात कोलकाताने २० षटकांत सात विकेट गमावून २७२ धावांचा डोंगर उभा केला, जी आयपीएलमधील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे.

विभाग