मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs CSK Dream 11 Prediction : पॅट कमिन्स नव्हे, आज या खेळाडूला बनवा कर्णधार, अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन

SRH vs CSK Dream 11 Prediction : पॅट कमिन्स नव्हे, आज या खेळाडूला बनवा कर्णधार, अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 05, 2024 12:37 PM IST

SRH vs CSK Dream 11 Prediction : सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये तीन सामने खेळले असून, त्यांनी फक्त एकच सामना जिंकला आहे आणि दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सीएसकेनेही यंदा तीन सामने खेळले असून यापैकी दोन सामने जिंकले आहेत.

SRH vs CSK Dream 11 Prediction todays match : आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन
SRH vs CSK Dream 11 Prediction todays match : आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन

SRH vs CSK Playing 11 Prediction : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या १८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आज (५ एप्रिल) संध्याकाळी ७:३० वाजेपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये तीन सामने खेळले असून, त्यांनी फक्त एकच सामना जिंकला आहे आणि दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सीएसकेनेही यंदा तीन सामने खेळले असून यापैकी दोन सामने जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. सीएसके सध्या ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर हैदराबाद सध्या सातव्या स्थानावर आहे.

सर्वांच्या नजरा या दोन खेळाडूंवर असतील

भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा आयपीएल २०२४ मध्ये २०० च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे. त्याने तीन डावात १२४ धावा ठोकल्या आहेत. याआधी गुजरात टायटन्सविरुद्धच्या झालेल्या सामन्यात अभिषेकने २९ धावा केल्या होत्या. तर मुंबईविरुद्ध त्याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा अभिषेकविरुद्ध सीएसेकचे गोलंदाज या लढतीवर खिळल्या आहेत.

तसेच, चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने आयपीएल २०२४ मध्ये अद्याप एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्याने तीन डावात केवळ ६२ धावा केल्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या संघाचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. गायकवाडने २०२२ च्या आयपीएलमध्ये SRH विरुद्ध ५७ चेंडूत ९९ धावा केल्या होत्या.

दरम्यान, हैदराबाद असो की सीएसके , दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match taam prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल. पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

SRH vs CSK ड्रीम इलेव्हन फॅन्टसी टीम:

यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन (उपकर्णधार)

फलंदाज: अजिंक्य रहाणे, ट्रॅव्हिस हेड, रचिन रवींद्र, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड (कर्णधार)

अष्टपैलू: एडन मार्कराम, डॅरिल मिशेल

गोलंदाज: पॅट कमिन्स, शार्दुल ठाकूर, मथिशा पाथिराना

IPL_Entry_Point