MS Dhoni IPL STATS : आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता उभय संघांमधील सामना खेळवला जाईल. सध्या चेन्नई सुपर किंग्ज ४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबाद ३ सामन्यांत २ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एम एस धोनी बॅट हैदराबादविरुद्ध चांगलीच चालते, असे मागील आकडेवारीवरून स्पष्ट होते. धोनीने SRH विरुद्ध शानदार फलंदाजी केली आहे. महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४८.८ च्या सरासरीने आणि १४५.२४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे, याआधीच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली होती. त्याने अवघ्या १६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार मारले. पण तो सीएसकेला विजय मिळवून देऊ शकला नाही.
सीएसकेने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यांनी दोन जिंकले आहेत आणि १ सामना गमावला आहे. सीएसकेने आरसीबी आणि गुजरातचा पराभव केला आहे. तर दिल्लीविरुद्ध त्यांचा पराभव झाला.
सनरायझर्स हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु त्यानंतर त्यांनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. मात्र, हा संघ विजयी घोडदौड कायम राखण्यात अपयशी ठरला. हैदराबादच्या तिसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने त्यांचा ७ गडी राखून पराभव केला होता.
सनरायझर्स हैदराबाद संघ हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, शाहबाज अहमद, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, ग्लेन फिलिप, नितीश रेड्डी, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, मार्को यानसेन, आकाश महाराज सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथीराना, मुस्तफिजुर रहमान, शारद शेख, रविंद्र जडेजा. , मोईन अली, मिचेल सँटनर, डेव्हॉन कॉनवे, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, आरएस हंगरगेकर, महेश थेक्षाना, निशांत सिंधू, अरावेली अवनीश.
संबंधित बातम्या