मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni: सचिन, सेहवागप्रमाणं धोनी इतर लीगमध्ये का खेळत नाही? ‘हे’ आहे खरं कारण

MS Dhoni: सचिन, सेहवागप्रमाणं धोनी इतर लीगमध्ये का खेळत नाही? ‘हे’ आहे खरं कारण

Sep 23, 2022, 05:49 PM IST

    • why MS Dhoni cant play other cricket leagues: भारतीय दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रैना सध्या लीजेंड्स क्रिकेट लीग खेळत आहे. त्याचबरोबर आता रॉबिन उथप्पालादेखील लीग क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळणार आहे.
MS Dhoni (hindustan times)

why MS Dhoni cant play other cricket leagues: भारतीय दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रैना सध्या लीजेंड्स क्रिकेट लीग खेळत आहे. त्याचबरोबर आता रॉबिन उथप्पालादेखील लीग क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळणार आहे.

    • why MS Dhoni cant play other cricket leagues: भारतीय दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रैना सध्या लीजेंड्स क्रिकेट लीग खेळत आहे. त्याचबरोबर आता रॉबिन उथप्पालादेखील लीग क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळणार आहे.

टीम इंडियाचा माजी महेंद्रसिंग धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनी ज्या स्पर्धेत सहभागी होतो ती स्पर्धा प्रचंड लोकप्रिय होते. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही महेंद्रसिंग धोनी IPL व्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या लीगमध्ये का खेळू शकत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? तर यामागचे खरे कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

वास्तविक, BCCI च्या नियमांनुसार, जर खेळाडूंना बीसीसीआयच्या छत्र छायेबाहेरील कोणत्याही संघासाठी खेळायचे असेल किंवा प्रशिक्षकाची भूमिका बजावायची असेल, तर त्या खेळाडूला भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी लागते. धोनी आयपीएल खेळत असल्याने त्याला कोणत्याही इतर क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नाही. जर त्याला लिजेंड्स लीग खेळायची असेल तर त्याला IPL मधूनही निवृत्ती घ्यावी लागेल.

धोनीने आधीच स्पष्ट केले आहे की, तो २०२३ चे IPL खेळणार आहे. अलीकडेच भारतीय दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रैना सध्या लीजेंड्स क्रिकेट लीग खेळत आहे. त्याचबरोबर आता रॉबिन उथप्पालादेखील लीग क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळणार आहे. तो बिग बॅश लीग, द हंड्रेड, व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्ट यांसारख्या कोणत्याही स्पर्धेसाठी साइन अप करू शकतो.