मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BAN W vs IND W: भारताचा बांगलादेशवर १९ धावांनी विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

BAN W vs IND W: भारताचा बांगलादेशवर १९ धावांनी विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 30, 2024 10:04 PM IST

Bangladesh Women vs India Women: भारत आणि बांगलादेश यांच्यात आज दुसरा टी-२० सामना खेळला गेला.

भारताने बांगलादेशचा १९ धावांनी पराभव केला.
भारताने बांगलादेशचा १९ धावांनी पराभव केला.

India Tour Of Bangladesh: सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) भारतीय महिला आणि बांगलादेश (Bangladesh Women vs India Women) यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर १९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. (दयालन हेमलता Dayalan Hemalatha) भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राधा यादव, दिप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर यांनी दमदार गोलंदाजी केली. बांगलादेशच्या संघाने २० षटकात १० विकेट्स गमावून ११९ धावापर्यंत मजल मारली. यजमानांकडून मुर्शिदा खातूनने सर्वाधिक ४६ धावा केल्या आहेत. या सामन्यात राधा यादवने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आहेत. तर, दिप्ती शर्मा आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. पूजा वस्त्राकरच्या खात्यात एक विकेट जमा झाली.

GT vs RCB: विल जॅक्स- कोहलीनं गुजरातच्या गोलंदाजीचं कंबरडं मोडलं; १६व्या षटकातच २०६ धावांचं लक्ष्य गाठलं!

या लक्ष्याचा पाठला करताना मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने डकवर्थ लुड्सच्या नियमाने ५.२ षटकात १९ धावांनी विजय मिळवला आहे. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर दयालन हेमलता २४ चेंडूत ४१ धावा कुटल्या आहेत. तर, भारताची सलामीवीर नाबाद ५ धावा केल्या. मात्र, पावसाने व्यत्यय आणल्याने या सामन्याचा निकाल डकवर्थ लूड्सच्या नियमांतर्गत घोषित करण्यात आला. बांगलादेशकडून मारुफा अख्तरने एक विकेट घेतली.

KKR vs DC Live Streaming: दिल्ली- कोलकाता आज एकमेकांशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

बांगलादेश महिला संघ:

दिलारा अक्टर, मुर्शिदा खातून, शोभना मोस्तरी, निगार सुलताना (विकेटकिपर/कर्णधार), फहिमा खातून, शोर्ना अक्टर, राबेया खान, नाहिदा अक्टर, सुलताना खातून, मारुफा अक्टर, फरिहा त्रिस्ना, रुबिया हैदर, शोरिफा खातून, हबीबा इस्लाम , रितू मोनी.

भारतीय महिला संघ:

स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकिपर), एस साजना, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, दीप्ती शर्मा, रेणुका ठाकूर सिंह, राधा यादव, दयालन हेमलता, अमनजोत कौर, सायका इशाक, तीतस साधू, आशा शोभना.

IPL_Entry_Point