IPL 2024: विजयी मार्गावर परतलेल्या दिल्ली कॅपिटल्स आज कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. दिल्लीने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. दुसरीकडे, कोलकात्याने २६१ धावांचा डोंगर उभा करूनही त्यांना पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला. या हंगामात कोलकाता- दिल्ली दुसऱ्यांदा एकमेकांच्या समोर येणार आहेत. याआधी दोन्ही संघात झालेल्या सामन्यात कोलकात्याने दिल्लीला पराभवाची धुळ चारली होती. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी दिल्लीचा संघ आज मैदानात उतरेल.दरम्यान, दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहायचा, हे जाणून घेऊयात.
कोलकात्याला दिल्लीविरुद्ध आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. या हंगामात कोलकाताच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. कोलकात्याचा आघाडीचा गोलंदाज मिचेल स्टार्कने खूप धावा खर्च केल्या आहेत. तर, वरुण चक्रवर्तीही चांगलाच महागात पडला आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात हर्षित राणा यालाही काही खास कामगिरी करता आली नाही. दुष्मंथा चमीरा हा देखील पूर्णपणे अपयशी ठरला.
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज (२९ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ४७ वा सामना खेळला जाईल. हा सामना कोलकाताच्या ईडन्स गार्डनवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकिपर, कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुमार कुशाग्रा, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद, रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, रिकी भुई, सुमित कुमार, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, ललित यादव, डेव्हिड वॉर्नर, यश धुल, स्वस्तिक चिकारा, झ्ये रिचर्डसन, इशांत शर्मा, गुलबदिन नायब.
फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, रमणदीप सिंह, अंगक्रिश रघुवंशी, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज, मिचेल स्टार्क, अल्लाह गझनफर, साकिब हुसैन, शेरफेन रदरफोर्ड, चेतन साकारिया, नितीश राणा, श्रीकर भारत.