मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Suresh Raina: सुरेश रैना गेल-पोलार्डच्या मार्गावर, BCCI शी संबंध तोडले; फक्त लीग क्रिकेट खेळणार

Suresh Raina: सुरेश रैना गेल-पोलार्डच्या मार्गावर, BCCI शी संबंध तोडले; फक्त लीग क्रिकेट खेळणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 06, 2022 10:34 AM IST

सुरेश रैनाने भारतीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने बीसीसीआय आणि यूपीसीएला याबाबत कळवले आहे. रैना ख्रिस गेल आणि पोलार्डप्रमाणे आता फक्त देश-विदेशातील लीग क्रिकेट खेळणार आहे.

Suresh Raina
Suresh Raina

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी एकाचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, सुरेश रैनाने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. तो आता ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड यांच्याप्रमाणे फक्त देश-विदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

धोनी आणि रैनाने एकाच वेळी निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे. मात्र, सुरेश रैनाला CSK ने खरेदी केले नाही. त्यामुळे रैना गेल्या बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून आहे. अशातच आता रैनाने भारतीय क्रिकेटपासून पूर्णपणे नाते तोडून टाकले आहे. रैना यापुढे आता आयपीएल आणि उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार नाही, त्याने तशी  माहिती उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (UPCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) ला दिली आहे.

सुरेश रैना आगामी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयकडून एनओसी मिळाल्यानंतर सुरेश रैना देश-विदेशातील विविध लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्याच्या आधी युवराज सिंग परदेशी लीग खेळला आहे आणि तो देशात आयोजित लीगमध्येही भाग घेऊ शकतो. 

विशेष म्हणजे, सुरेश रैनाला UPCA कडून एनओसी मिळाली आहे. रैनाने देखील याची पुष्टी केली आहे. रैना १० सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा देखील भाग असेल. गेल्या आठवडाभरापासून तो सराव करत आहे. २०५ आयपीएल सामने खेळलेल्या सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि यूएईच्या टी-20 लीगसोबतही संपर्क साधल्याची माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नवीन T20 लीगमध्येही तो खेळू शकतो.

WhatsApp channel