मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sachin Tendulkar video: २४ वर्षांनंतरही तोच अंदाज, सचिनचा सिक्स पाहून चाहते म्हणाले… शारजाह 2.0

Sachin Tendulkar video: २४ वर्षांनंतरही तोच अंदाज, सचिनचा सिक्स पाहून चाहते म्हणाले… शारजाह 2.0

Sep 23, 2022, 12:28 PM IST

    • Sachin Tendulkar Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वयाच्या ४९ व्या वर्षी अगदी तसाच खेळत आहे. जसा तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत खेळत होता. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये तो सुरेख फॉर्ममध्ये दिसत आहे. 
Sachin Tendulkar

Sachin Tendulkar Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वयाच्या ४९ व्या वर्षी अगदी तसाच खेळत आहे. जसा तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत खेळत होता. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये तो सुरेख फॉर्ममध्ये दिसत आहे.

    • Sachin Tendulkar Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वयाच्या ४९ व्या वर्षी अगदी तसाच खेळत आहे. जसा तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत खेळत होता. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये तो सुरेख फॉर्ममध्ये दिसत आहे. 

India Legends vs England Legends: सध्या भारतात रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज या क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील सचिन तेंडुलकरचा संघ इंडिया लीजेंड्सची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. यामागे कर्णधार सचिन तेंडुलकरची मोठी भूमिका आहे. गुरुवारी डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स आणि इंग्लंड लीजेंड्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात इंडिया लिजेंड्सने ४० धावांनी विजय मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

या सामन्यात सचिनने २० चेंडूत ४० ठोकल्या. या खेळीमुळे सचिनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सचिनने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. यातील एका षटकाराने २४ वर्षांपूर्वीच्या सचिनची आठवण करुन दिली.

सचिनने १९९८ मध्ये शारजाहमध्ये ज्या पद्धतीने षटकार मारला होता, अगदी तसाच षटकार त्याने काल इंग्लंड लिजेंड्सविरुद्ध मारला. यानंतर या दोन्ही शॉट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सचिनच्या शानदार खेळीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने १५ षटकांत ५ गडी गमावून १७० धावांचा डोंगर उभारला होता. पावसामुळे सामना १५ षटकांचा खेळवण्यात आला. प्रत्युत्तरात इंग्लंड लीजेंड्सचा संघ १५ षटकांत ६ बाद १३० धावाच करू शकला. इंडिया लिजंड्सकडून राजेश पवारने ३ षटकात १२ धावा देत ३ बळी घेतले.