मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Mar 22, 2024, 11:32 AM IST

  • 3 Lack Condoms For Paris 2024 Athletes: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये ३ लाख कंडोम वाटले जाणार आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १४ हजार ५०० खेळाडूंमध्ये ३ लाख कंडोमचे वाटप केले जाणार आहेत. (AP)

3 Lack Condoms For Paris 2024 Athletes: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये ३ लाख कंडोम वाटले जाणार आहेत.

  • 3 Lack Condoms For Paris 2024 Athletes: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये ३ लाख कंडोम वाटले जाणार आहेत.

Paris Olympics 2024 News: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये कंडोम वाटले जाणार आहेत. २०२२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या १४ हजार २५० खेळाडूंना ३ लाख कंडोम दिले जातील, अशी माहिती ऑलिंपिक व्हिलेजचे संचालक लॉरेंट मिकॉड यांनी एका मुलाखतीत दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

सरकारने ऑलिम्पिकदरम्यान शारीरिक संबंधावर बंदी घातली होती. २०२० मध्ये कोविडच्या प्रवेशानंतर सर्व खेळाडूंना एकमेकांपासून अंतर राखण्यास सांगण्यात आले होते. परंतु, आता ऑलिम्पिक संचालकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑलिम्पिकदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यावरील बंदी हटवण्यात आली. अशा परिस्थितीत आता ऑलिम्पिकदरम्यान क्वार्टरमध्ये राहणाऱ्या खेळाडूंना ३ लाख कंडोमचे वाटप केले जाणार आहे, जेणेकरून ते आपल्या जोडीदारांसोबत शारीरिक संबंध ठेवू शकतील.

२०२० च्या ऑलिम्पिकमध्येही खेळाडूंना कंडोमचे वाटप करण्यात आले होते. परंतु कोणालाही शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. सर्व खेळाडूंना एकमेकांपासून साडेसहा फूट अंतर ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

ऑलिंपिकमध्ये कंडोम देण्याची प्रथा नवीन नाही. एचआयव्ही आणि एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी १९८८ च्या सोल ऑलिंपिकदरम्यान सुमारे ८ हजार ५०० कंडोम देण्यात आले. मात्र, गेल्या काही वर्षांत ही संख्या वाढली. २००० मध्ये सिडनी ऑलिंपिकमध्ये आयोजकांनी ७० हजार कंडोमची व्यवस्था केली. परंतु, मात्र हे कंडोम कमी पडल्याने आणखी २००० कंडोमची व्यवस्था करण्यात आली. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ४ लाख ५० हजार पुरुष आणि महिला कंडोम वितरित करण्यात आले.

विभाग