मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Mar 16, 2024, 10:20 PM IST

  • Achinta Sheuli Caught Entering Womens Hostel: २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा अचिंता शेऊलीला रात्रीचे गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसताना सुरक्षारक्षकांनी पकडले.

Achinta Sheuli won gold at 2022 CWG. (Getty)

Achinta Sheuli Caught Entering Womens Hostel: २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा अचिंता शेऊलीला रात्रीचे गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसताना सुरक्षारक्षकांनी पकडले.

  • Achinta Sheuli Caught Entering Womens Hostel: २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा अचिंता शेऊलीला रात्रीचे गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसताना सुरक्षारक्षकांनी पकडले.

Achinta Sheuli: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरणारा वेटलिफ्टर अचिंता शिऊलीला एनआयएस पतियाळा येथील महिलांच्या वसतिगृहात रात्रीचे प्रवेश करताना सुरक्षारक्षकांनी पकडले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात भाग घेणाऱ्या अंचिताला सुरक्षारक्षकांनी पकडून त्याचा व्हिडिओ बनवला. साहजिकच अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. अचिंताला तात्काळ शिबिर सोडण्यास सांगण्यात आले,' असे भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या (आयडब्ल्यूएलएफ) एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि एनआयएस पटियालाचे कार्यकारी संचालक विनीत कुमार यांना या घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली. या घटनेचे व्हिडिओ पुरावे असल्याने साईने चौकशी समिती स्थापन केली नाही. हा व्हिडिओ एनआयएस पतियाळा ईडी विनीत कुमार आणि नवी दिल्लीतील साईच्या मुख्यालयाला पाठवण्यात आला आणि आयडब्ल्यूएलएफला अचिंताला शिबिरातून काढून टाकण्यास सांगण्यात आले, अशी माहिती प्राप्त झाली.

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

२०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिंपिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकणारा शेऊली शुक्रवारी शिबिरातून बाहेर पडला. पतियाळा येथील या केंद्रात पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र वसतिगृह आहेत. सध्या एनआयएसमध्ये महिला बॉक्सर, खेळाडू आणि कुस्तीगीर आहेत.

शिस्तभंगासाठी आयडब्ल्यूएलएफने लिफ्टरवर कठोर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रकुल आणि युवा ऑलिंपिक चॅम्पियन जेरेमी लालरिनुंगाला यापूर्वी बेशिस्तपणाच्या कारणास्तव राष्ट्रीय शिबिरातून बाहेर काढण्यात आले होते.

Bajrang Punia : धक्कादायक! बजरंग पुनियाचा ट्रायल्समध्येच पराभव, पॅरिस ऑलिम्पिकचे दरवाजे बंद

शिऊली ऑलिम्पिक शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर त्याची ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची शक्यताही संपुष्टात आली. कारण, त्याला या महिन्यात थायलंडमधील फुकेत येथे होणाऱ्या आयडब्ल्यूएफ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवले जाणार नाही, जी पॅरिस ऑलिम्पिकपात्रतेसाठी अनिवार्य स्पर्धा आहे.

टोकियो ऑलिम्पिकरौप्यपदक विजेती मीराबाई चानू (४९ किलो) आणि राष्ट्रकुल रौप्यपदक विजेती बिंद्याराणी देवी यांनाच पॅरिस ऑलिम्पिकच्या शर्यतीत कायम ठेवण्यात आले आहे. आयडब्ल्यूएफ विश्वचषकात भाग घेण्यासाठी हे दोघे या महिन्याच्या अखेरीस थायलंडला जातील. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हिप टेंडिनिटिसच्या दुखापतीनंतर चानू या स्पर्धेत पुनरागमन करणार आहे.

विभाग