मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

Mar 11, 2024, 09:58 PM IST

    • Wrestling Trials for Paris Olympic Games : पतियाळा येथे पॅरिस ऑलिम्पिकसाठी कुस्तीपटूंच्या ट्रायल्स सुरू आहेत. पण यादरम्यान स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो आणि ५३ किलो वजनी गटातील ट्रायल्स सुमारे तीन तास सुरू होऊ दिल्या नाहीत. तिला ५० आणि ५३ अशा दोन्ही कॅटेगरीतून भाग घ्यायचा होता.
Vinesh Phogat Wrestling Trials for Paris Olympic Games : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या,

Wrestling Trials for Paris Olympic Games : पतियाळा येथे पॅरिस ऑलिम्पिकसाठी कुस्तीपटूंच्या ट्रायल्स सुरू आहेत. पण यादरम्यान स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो आणि ५३ किलो वजनी गटातील ट्रायल्स सुमारे तीन तास सुरू होऊ दिल्या नाहीत. तिला ५० आणि ५३ अशा दोन्ही कॅटेगरीतून भाग घ्यायचा होता.

    • Wrestling Trials for Paris Olympic Games : पतियाळा येथे पॅरिस ऑलिम्पिकसाठी कुस्तीपटूंच्या ट्रायल्स सुरू आहेत. पण यादरम्यान स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो आणि ५३ किलो वजनी गटातील ट्रायल्स सुमारे तीन तास सुरू होऊ दिल्या नाहीत. तिला ५० आणि ५३ अशा दोन्ही कॅटेगरीतून भाग घ्यायचा होता.

Wrestling Trials for Paris Olympic 2024 : या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय कुस्तीपटूंची निवड चाचणी सुरू आहे. पण या निवड चाचणीदरम्यान, महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सोमवारी (११ मार्च) पटियाला येथे चांगलाच गोंधळ घातला. विनेशला दोन वजनी गटात खेळायचे होते.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

बराच गदारोळ झाल्यानंतर विनेशला दोन सामन्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली. तिने ट्रायल्समध्ये महिलांच्या ५० किलो आणि ५३ किलो वजनी गटात भाग घेतला. मात्र यादरम्यान तिने ५० किलो वजनी गटात बाजी मारली. तर ५३ किलो वजनी गटात विनेशला पराभवाचा सामना करावा लागला.

५३ किलो वजनी गटात विनेशचा पराभव

५३ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत विनेशचा ०-१० अशा फरकाने पराभव झाला. मात्र ५० किलो वजनी गटात विजय मिळवल्यानंतर विनेशला आता आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी प्रवेश मिळाला आहे. तिने ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत शिवानीचा पराभव केला आहे.

या दोन सामन्यांच्या आधी बराच वेळ गोंधळ झाला. विनेशला दोन्ही गटात स्पर्धा करायची होती. तसेच, ५३ किलो वजनी गटाचे ट्रायल्स हे ऑलिम्पिकच्या काही दिवसआधी व्हावेत, अशी विनेशची इच्छा होती. पण हे होऊ शकले नाही.

सामन्यापूर्वी विनेशने गोंधळ घातला

ही मागणी नाकारल्यानंतर विनेश फोगटने गोंधळ घातला. ऑलिम्पिकच्या काही दिवस आधी ५३ किलो वजनी गटाचे ट्रायल्स घेतले जावे, असे लेखी आश्वासन तिने अधिकाऱ्यांकडून मागितले होते. यामुळे विनेशने महिलांच्या ५० किलो आणि ५३ किलो वजनी गटातील ट्रायल्स होऊ दिल्या नाहीत. या विलंबामुळे बाकीचे पैलवान नाराज झालेले दिसले.

दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या अ‍ॅडहॉक पॅनेलद्वारे या निवड चाचण्या आयोजित केल्या जात आहेत. यापूर्वी, क्रीडा मंत्रालयाकडून निलंबित करण्यात आलेले WFI त्याचे आयोजन करत होते. यानंतर आता IOA ने स्थापन केलेल्या अ‍ॅडहॉक समितीने आधीच स्पष्ट केले आहे की ५३ किलो वजनी गटासाठी ही शेवटची ट्रायल असेल.