IPL 2024: लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ टॉप ४ मधून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघाला सामना जिंकणे आवश्यक आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.
आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स एकूण चार वेळा एकमेकांच्या समोर आले. यापैकी चार सामन्यात लखनौच्या संघाने विजय मिळवला आहे. तर, फक्त एका सामन्यात मुंबईच्या संघाला विजय मिळवता आला आहे. जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले, तेव्हा धावसंख्या २०० च्या वर गेला नाही. मुंबईने लखनौविरुद्ध १९९ धावांची सर्वोच्च धावसंख्या केली. तर, लखनौने मुंबईविरुद्ध १८२ धावांची सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
लखनौमधील एकना स्टेडियमची खेळपट्टी सहसा संथ असते. त्यामुळे या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होत नाही. लखनौची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. जसजसा सामना पुढे सरकतो तसतसे फलंदाजांना धावा काढणे फार कठीण होते. आयपीएलमध्ये लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले गेले. यापैकी पाच सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तर, एक सामन्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. हिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६० आहे. तर, दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या केवळ १२२ इतकी आहे.
लखनौचा संभाव्य संघ: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकिपर, कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.
इम्पॅक्ट प्लेअर: अमित मिश्रा/मयंक यादव
मुंबईचा संभाव्य संघ: रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड/गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
इम्पॅक्ट प्लेअर: सूर्यकुमार यादव.