Rohit Sharma Birthday : रोहितचे कुटुंब एका खोलीत राहायचे, आज आहे इतक्या कोटींच्या आलिशान घराचा मालक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma Birthday : रोहितचे कुटुंब एका खोलीत राहायचे, आज आहे इतक्या कोटींच्या आलिशान घराचा मालक

Rohit Sharma Birthday : रोहितचे कुटुंब एका खोलीत राहायचे, आज आहे इतक्या कोटींच्या आलिशान घराचा मालक

Apr 29, 2024 10:49 PM IST

Rohit Sharma Birthday : भारताचा कर्णधार त्याच्या पॉवर हिटिंग आणि अनेक विक्रमांसाठी ओळखला जातो. सोबतच रोहित शर्माने करोडोंची संपत्तीही कमावली आहे.

Rohit Sharma Birthday : रोहितचे कुटुंब एका खोलीत राहायचे, आज आहे तब्बल इतक्या कोटींच्या आलिशान घराचा मालक
Rohit Sharma Birthday : रोहितचे कुटुंब एका खोलीत राहायचे, आज आहे तब्बल इतक्या कोटींच्या आलिशान घराचा मालक

रोहित शर्मा या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. टीम इंडियाचा कर्णधार त्याच्या पॉवर हिटिंग आणि अनेक विक्रमांसाठी ओळखला जातो. रोहित शर्मा मंगळवारी (३० एप्रिल) ३७ वर्षांचा झाला आहे. 

त्याच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी, त्याच्यावर देशभरातील चाहते आणि क्रिकेट दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय संघाकडून खेळताना रोहितने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने एकूण ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, परंतु चाहते त्याच्या प्रोफेशनल जीवनाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जवळून जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. 

अशा परिस्थितीत आपण येथे रोहित शर्माची एकूण संपत्ती किती आहे? ते जाणून घेणार आहोत.

वास्तविक, रोहित शर्माचे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा आहे. त्याचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपुरात झाला. रोहितने भारतीय संघासाठी २००७ मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचे कसोटी पदार्पण २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाले होते. त्यानंतर त्याने भारताला अनेक सामने जिंकवून आपले नाव इतिहासात नोंदवले आहे.

रोहित शर्माकडे महागड्या कारचे कलेक्शन 

रोहितकडे BMW M5, BMW X3, Fortuner, Skoda Laura, Toyota Fortuner, Mercedes-Benz GLS 350d सारख्या कार आहेत. याशिवाय भारतीय कर्णधाराकडे रेसिंग कार देखील आहे.

रोहित शर्मासारख्या बड्या स्टारसाठी विदेशी कारचे कलेक्शन करणे सोपे आहे. रोहितने त्याची पहिली कार स्कोडा लॉरा खरेदी केली होती. विराट कोहली आणि इतर भारतीय क्रिकेटपटूंच्या विपरीत, रोहित शर्माच्या कारची रेंज अतिशय माफक आहे. रोहित शर्माकडे ७ वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार आहेत.

रोहितची ब्रेड व्हॅल्यू खूप जास्त आहे आणि त्याला जगभरातून खूप प्रेम मिळते. रोहितच्या उत्पन्नाचा स्त्रोत केवळ आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेट सामनेच नाही तर आयपीएल देखील आहे.

रोहित शर्माकडे ३० कोटींचं घर

रोहित शर्माच्या लक्झरी लाइफमध्ये त्याचे घरही तितकेच आलिशान आहे, जे त्याने ३०१५ मध्ये खरेदी केले होते. या घराची किंमत जवळपास ३० कोटी रुपये आहे.

रोहित शर्माच्या आलिशान घराबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे घर मुंबईतील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. रोहित शर्माचे हे घर आहुजा टॉवर्स, वरळी, मुंबई येथे आहे. २०१५ मध्ये रितिकासोबतच्या लग्नानंतर रोहित शर्माने हे घर ३० कोटींना विकत घेतले होते. हे घर सिंगापूरचे प्रसिद्ध डिझायनर 'Palmer & Turner' यांनी डिझाइन केले आहे.

या आलिशान घरात बैठकीसाठी ऑफिस रूम, मिनी थिएटर, स्विमिंग पूल अशा आकर्षक गोष्टी करण्यात आल्या आहेत. आहुजा टॉवर्सच्या २९व्या मजल्यावर ६००० स्क्वेअर फूटमध्ये रोहितचे घर बांधलेले आहे. रोहितच्या घराच्या बाल्कनीतून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते.

Whats_app_banner