Sanju Samson : संजू सॅमसन सिंहासारखा गरजला, दुर्लक्ष करणाऱ्या निवडकर्त्यांना दिला इशारा, पाहा-sanju samson celebration video viral after playing match winning knock for rajasthan royals in ipl 2024 rr vs lsg ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : संजू सॅमसन सिंहासारखा गरजला, दुर्लक्ष करणाऱ्या निवडकर्त्यांना दिला इशारा, पाहा

Sanju Samson : संजू सॅमसन सिंहासारखा गरजला, दुर्लक्ष करणाऱ्या निवडकर्त्यांना दिला इशारा, पाहा

Apr 28, 2024 06:08 PM IST

sanju samson celebration video : आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या संजू सॅमसनने एकना स्टेडियमवर षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि गर्जना करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

Sanju Samson : संजू सॅमसन सिंहासारखा गरजला, दुर्लक्ष करणाऱ्या निवडकर्त्यांना दिला इशारा, पाहा
Sanju Samson : संजू सॅमसन सिंहासारखा गरजला, दुर्लक्ष करणाऱ्या निवडकर्त्यांना दिला इशारा, पाहा

sanju samson vs LSG Highlights : आयपीएल २०२४ चा ४४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने लखनौचा धुव्वा उडवला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने मॅचविनिंग इनिंग खेळली.

पण, या सामन्यातील संजू सॅमसनच्या उत्क्रुष्ट खेळीपेक्षा त्याच्या विजयी सेलिब्रेशनचीच चर्चा अधिक होत आहे.

वास्तविक, आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या संजू सॅमसनने एकना स्टेडियमवर षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि गर्जना करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

निवडकर्त्यांना इशारा मिळाला

संजू सॅमसन चालू मोसमात चमकदार कामगिरी करत असून त्याने आगामी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड होण्यासाठी आपला दावा ठोकला आहे. संजूने ८ सामन्यात ७७ च्या सरासरीने ३८५ धावा केल्या आहेत. सोशल मीडियावर सॅमसनचे सेलिब्रेशन पाहिल्यानंतर युजर्स कमेंट करून म्हणत आहेत की, “संजूच्या गर्जेनेचा आवाज सिलेक्टर्सच्या कानात घुमेल आणि त्याला वर्ल्ड कपचे तिकीट मिळेल, ही अपेक्षा आहे”.

संजूने ठोकल्या ३३ चेंडूत ७१ धावा

दरम्यान, संजू सॅमसनने लखनौत केवळ ३३ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७१ धावा फटकाल्या. राजस्थान रॉयल्सने कर्णधाराच्या खेळीच्या बळावर लखनौ सुपरजायंट्सचा एक षटक बाकी असताना ७ गडी राखून पराभव केला.

यानंतर संजू सॅमसनने आक्रमक पद्धतीने गर्जना केली आणि विजय साजरा केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

सॅमसनला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या खेळीच्या जोरावर सॅमसनने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुलला मागे टाकले आहे. तो आता विराट कोहलीच्या मागे आहे. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने ९ सामन्यात ७७ च्या सरासरीने ३८५ धावा ठोकल्या आहेत.

राजस्थान रॉयल्स जवळपास प्लेऑफमध्ये

लखनौ सुपरजायंट्सने शनिवारी प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने १९ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सचा ९ सामन्यांमधला हा ८वा विजय असून ते प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या जवळ आहेत.

उल्लेखनीय आहे की राजस्थान रॉयल्स हा एकमेव संघ आहे, ज्याने चालू हंगामात फक्त एकच सामना गमावला आहे.

राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना २ मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. रॉयल्सला हा सामना जिंकून प्लेऑफसाठी अधिकृतरित्या पात्र ठरण्याची मोहर उमटवायची आहे. राजस्थान रॉयल्स चालू मोसमात प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ असेल.

Whats_app_banner