मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK Vs RR : रियान परागची दमदार खेळी... राजस्थानचे सीएसकेसमोर १४२ धावांचे लक्ष्य

CSK Vs RR : रियान परागची दमदार खेळी... राजस्थानचे सीएसकेसमोर १४२ धावांचे लक्ष्य

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 12, 2024 05:14 PM IST

CSK Vs RR Scorecard IPL 2024 : आयपीएल २०२४ चा ६१ वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १४१ धावा केल्या आहेत.

CSK Vs RR Scorecard IPL 2024
CSK Vs RR Scorecard IPL 2024 (ANI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज (१२ मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी निर्धारित २० षटकात ५ बाद १४१ धावा केल्या आहेत. सीएसकेला सामना जिंकण्यासाठी १४२ धावा करायच्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

स्लो पीचवर राजस्थानकडून रियान परागने ३५ चेंडूत सर्वाधिक ४७ धावा केल्या. तर चेन्नईकडून सिमरजीत सिंगने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याने राजस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांना आपला बळी बनवले. 

नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात काही खास नव्हती. जैस्वाल आणि बटलरने पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली, परंतु ती अतिशय संथ गतीने आली, त्यानंतर राजस्थानला डावाच्या शेवटपर्यंत वेगवान धावा करता आल्या नाहीत. संघात उपस्थित असलेले अनेक दिग्गज आणि स्टार फलंदाज पूर्णपणे फ्लॉप झाल्याचे दिसून आले.

राजस्थानकडून प्रथम फलंदाजीला आलेले यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ (३८ चेंडू) धावांची भागीदारी केली. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात यशस्वी जैस्वालने ७व्या षटकात आपली विकेट गमावली. सिमरजीतने जैस्वालला आपला शिकार बनवले. यशस्वीने २१ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २४ धावा केल्या. त्यानंतर संथ गतीने खेळत असलेला जोस बटलरही ९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

सिमरजीतनेच बटलरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बटलरने २५ चेंडूत केवळ चौकारांसह २१ धावा केल्या.

त्यानंतर कर्णधार संजू आणि रियान पराग यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली आणि तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची (३७ चेंडू) भागीदारी केली. सिमरजीत सिंगने १५व्या षटकात ही भागीदारी तोडली आणि सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. राजस्थानच्या कर्णधाराने १९ चेंडूत १५ धावा केल्या.

त्यानंतर वेगवान धावा काढणाऱ्या ध्रुव जुरेलच्या रूपाने १३१ धावांवर राजस्थानने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौथी विकेट गमावली. जुरेलने १८ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. यानंतर पुढच्या चेंडूवर शुभम दुबे गोल्डन डकवर बाद झाला. रियन पराग आणि रविचंद्रन अश्विन अखेरपर्यंत नाबाद परतले. रायनने ४७* आणि अश्विनने १* धावा केली.

IPL_Entry_Point