CSK vs RR IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ६१ वा सामना आज १२ मे (रविवार) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा ५ गडी राखून पराभव केला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यजमान संघाला विजयासाठी १४२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी १८.२ षटकात पूर्ण केले.
दरम्यान, या सामन्यात राजस्थानने अत्यंत कमी धावा केल्यामुळे चाहते खूपच संतप्त झाले आहेत. तसेच सोशल मीडिया चाहते सीएसके आणि राजस्थान यांच्यातील सामना फिक्स असल्याचे म्हणत आहेत.
वास्तविक, राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत वर्चस्व गाजवले आहे. या सामन्यात जोस बटलर आणि संजू सॅमसन सारख्या बलाढ्य फलंदाजांनी १०० पेक्षा कमी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यामुळे चाहते संतप्त झाले आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत त्यांचे सर्व सामने खूप चांगल्या फरकाने जिंकले आहेत. पण CSK विरुद्धच्या सामन्यात अचानक राजस्थानचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. अशा स्थितीत लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत.
याबाबत एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले, की २०२४ मध्ये पहिल्यांदाच राजस्थान खूप हळू खेळत आहे.
यानंतर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, की ही फलंदाजांची खेळपट्टी आहे ज्यावर १८५ पेक्षा जास्त धावा होतात, परंतु आरआर खेळाडू आता संथ खेळपट्टीचे कारण देत आहेत.
त्याच वेळी, अनेक युजर्सनी असा दावा केला, आहे की ',आयपीएल २०२४ मधील चेन्नईचा हा शेवटचा होम सामना आहे आणि धोनीला चांगल्या आठवणींनी विजयी निरोप देण्यासाठी हा सामना फिक्स करण्यात आला आहे".
विशेष म्हणजे, २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू एस श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते. त्यांना अटकही करण्यात आली होती, यानंतर काही काळानंतर CSK चे अध्यक्ष एन श्रीनिवासन गुरुनाथ मयप्पन यांचाही या मॅच फिक्सिंगच्या कटात सहभाग असल्याचे उघड झाले. याच कारणामुळे २०१५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स फ्रँचायझींना आयपीएलमधून २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
अशा स्थितीत सोशल मीडिया युजर्स राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांना आयपीएलमधील दोन सर्वात मोठे फिक्सर संघ म्हणून संबोधत आहेत.
संबंधित बातम्या