CSK Vs RR : राजस्थानची प्रथम फलंदाजी, सीएसकेसाठी ‘करो या मरो’चा सामना, पाहा प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK Vs RR : राजस्थानची प्रथम फलंदाजी, सीएसकेसाठी ‘करो या मरो’चा सामना, पाहा प्लेइंग इलेव्हन

CSK Vs RR : राजस्थानची प्रथम फलंदाजी, सीएसकेसाठी ‘करो या मरो’चा सामना, पाहा प्लेइंग इलेव्हन

May 12, 2024 03:16 PM IST

CSK Vs RR IPL 2024 : आयपीएल २०२४ चा ६१ वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

CSK Vs RR : राजस्थानची प्रथम फलंदाजी, सीएसकेसाठी ‘करो या मरो’चा सामना, पाहा प्लेइंग इलेव्हन
CSK Vs RR : राजस्थानची प्रथम फलंदाजी, सीएसकेसाठी ‘करो या मरो’चा सामना, पाहा प्लेइंग इलेव्हन

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज (१२ मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि  राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या राजस्थानचे लक्ष हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्यावर असेल, तर गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करणारा CSK संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल आणि बाद फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न करेल.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ध्रुव जुरेलचे राजस्थान संघात पुनरागमन झाले आहे, तर महेश थीक्षनाचेही चेन्नई संघात पुनरागमन झाले आहे. चेन्नईने मिचेल सँटनरच्या जागी थिक्षानाचा समावेश केला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थेक्षाना.

इम्पॅक्ट सब: अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, प्रशांत सोळंकी, अजय मंडल, मुकेश चौधरी.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

इम्पॅक्ट सब: रोव्हमन पॉवेल, टॉम कोहलर कॅडमोर, नांद्रे बर्जर, तनुष कोटियन, केशव महाराज.

सीएसके वि. राजस्थान हेड टू हेड

चेन्नई आणि राजस्थान यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध २९ आयपीएल सामने खेळले आहेत. सीएसकेने १५ तर आरआरने १४ जिंकले आहेत. सीएसकेची राजस्थानविरुद्धची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या २४६ धावा आहे. चेन्नईविरुद्ध आरआरचा सर्वोच्च स्कोअर २२३ धावा आहे.

सीएसके वि. राजस्थान पीच रिपोर्ट

वास्तविक, आयपीएलच्या या हंगामात चेपॉकच्या खेळपट्टीचा मूड वेळोवेळी बदलत आहे. या मैदानावर अनेक सामन्यांमध्ये खूप धावा झाल्या आहेत, तर खेळपट्टी अनेक सामन्यांमध्ये फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे या खेळपट्टीचे स्वरूप समजणे सोपे नाही. या मोसमात पहिल्या डावात सरासरी १८३ धावा झाल्या आहेत. तसेच, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ६ सामन्यांत ४ वेळा विजय मिळवला आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळते, पण फलंदाजांनी थोडा वेळ क्रीजवर घालवला तर धावा काढणे सोपे जाते.

 

Whats_app_banner