CSK vs RR Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ६१ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) राजस्थान रॉयल्सचा ५ गडी राखून पराभव केला आहे. आज १२ मे (रविवार) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यजमान संघाला विजयासाठी १४२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी १८.२ षटकात पूर्ण केले.
चालू मोसमातील १३ सामन्यांमधला सीएसकेचा हा सातवा विजय ठरला. गुणतालिकेत ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा १२ सामन्यांमधला हा चौथा पराभव ठरला.
चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४१ चेंडूत ४२ धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात २ षटकार आणि १ चौकार समाविष्ट होता. चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर ऋतुराजने शेवटपर्यंत ठाम राहून संघाला विजयापर्यंत नेले.
सलामीवीर रचिन रवींद्रनेही १८ चेंडूत २ षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. राजस्थानसाठी राजस्थान आर. अश्विनने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नांद्रे बर्गर यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या ३५ चेंडूत ४७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर राजस्थानने २० षटकांत ५ बाद १४१ धावा केल्या.
रियानने त्याच्या खेळीत ३ षटकारांसह १ चौकार मारला. ध्रुव जुरेलनेही १८ चेंडूत २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने २८ धावा केल्या. सीएसकेकडून सिमरजीत सिंगने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर तुषार देशपांडने दोन विकेट घेतले.
संबंधित बातम्या