आयपीएल २०२४ च्या ६२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा आहे.
या सामन्यानत दिल्ली कॅपिटल्सचा हंगामी कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज ऋषभ पंतच्या जागी कुमार कुशाग्र आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. त्याचवेळी रसिक दारही आज खेळत आहेत.
तर बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.
इम्पॅक्ट सब: स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशाक, हिमांशू शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
इम्पॅक्ट सब: डेव्हिड वॉर्नर, सुमित कुमार, रिकी भुई, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे.
आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३० सामने झाले आहेत. यापैकी बेंगळुरूने १८ सामने जिंकले आहेत तर दिल्लीने ११ सामन्यात विजयाची चव चाखली आहे. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला.
यंदाच्या मोसमात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. दिल्लीविरुद्ध बेंगळुरूची सर्वोच्च धावसंख्या २१५ आहे तर सर्वात कमी धावसंख्या १३७ आहे. त्याचवेळी दिल्लीने आरसीबीविरुद्ध १९६ धावा केल्या आहेत तर सर्वात कमी धावसंख्या ९५ धावा आहे.
संबंधित बातम्या