मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनी आज निवृत्त होणार? सामना संपल्यानंतर चाहत्यांनी मैदानातच थांबावे, CSK ची विनंती

MS Dhoni : धोनी आज निवृत्त होणार? सामना संपल्यानंतर चाहत्यांनी मैदानातच थांबावे, CSK ची विनंती

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 12, 2024 05:55 PM IST

MS Dhoni Retirement CSK Tweet : आयपीएल २०२४ मध्ये, CSK घरच्या मैदानावर शेवटचा लीग सामना खेळत आहे. या मैदानावर सीएसकेचा सामना राजस्थानशी आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी सीएसकेने मोठी घोषणा केली आणि चाहत्यांना खास आवाहन केले आहे.

MS Dhoni : धोनी आज निवृत्त होणार? सामना संपल्यानंतर चाहत्यांनी मैदानातच थांबावे, CSK ची विनंती
MS Dhoni : धोनी आज निवृत्त होणार? सामना संपल्यानंतर चाहत्यांनी मैदानातच थांबावे, CSK ची विनंती (IPL Twitter)

एमएस धोनीची फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे. माहीची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जायला नेहमीच तयार असतात. आयपीएल २०२४ मध्ये धोनीला पाहण्यासाठी चाहते लांबचा प्रवास करून स्टेडियममध्ये पोहोचताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, आज आयपीएल २०२४ मध्ये ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्पूर्वी, या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सने एक ट्विट केले आहे. यावरून धोनी चेपॉकवरील शेवटचा सामना खेळत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

धोनी यंदाच्या आयपीएलनंतर निवृत्त होणार, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता सीएसकेने त्याच्या एक्सवर एक ट्विट शेअर केले आहे आणि त्यात त्याने चाहत्यांना खास आवाहन केले आहे. ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, कदाचित धोनीचा हा चेपॉकवरील शेवटचा आयपीएल सामना असावा असा इशारा या ट्विटच्या माध्यमातून चाहत्यांना देण्यात येत आहे.

वास्तविक, CSK संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS धोनी) याने काही वर्षांपूर्वी इच्छा व्यक्त केली होती की त्याला त्याच्या IPL कारकिर्दीतील शेवटचा सामना चेपॉकमध्ये खेळायचा आहे, कारण त्याने तसे केले नाही तर तो चाहत्यांवर अन्याय होईल. अशा परिस्थितीत चेपॉकमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान CSK फ्रँचायझीने ट्विटरवर एक ट्विट केले आहे.

CSK फ्रँचायझीने आपल्या X पोस्टमध्ये लिहिले आहे, “की सर्व सुपरफॅन्सना विनंती आहे की मॅच नंतर थांबावे, कारण काहीतरी खास येत आहे”.

या पोस्टनंतर धोनी आज शेवटचा आयपीएल सामना खेळत असल्याचा अंदाज प्रत्येकजण लावत आहे. चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. सीएसकेच्या होम ग्राऊंडवर आणि आपल्या लाडक्या चाहत्यांसमोर धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतो.

सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. IPL च्या पहिल्या लिलावात धोनीला CSK ने जवळपास ६ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. CSK ने पाच वेळा (२०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३) IPL चे विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने CSK साठी दोन ट्रॉफी जिंकल्या.

IPL_Entry_Point