IPL 2024 : बेबी आने वाला है... साक्षी धोनीची इन्स्टा स्टोरी व्हायरल, याचा नेमका अर्थ काय? चाहते गोंधळात
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : बेबी आने वाला है... साक्षी धोनीची इन्स्टा स्टोरी व्हायरल, याचा नेमका अर्थ काय? चाहते गोंधळात

IPL 2024 : बेबी आने वाला है... साक्षी धोनीची इन्स्टा स्टोरी व्हायरल, याचा नेमका अर्थ काय? चाहते गोंधळात

Apr 29, 2024 04:48 PM IST

Sakshi Dhoni IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या ४६ व्या सामन्यात रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि सीएसके यांच्यात सामना झाला.या सामन्यात CSK ने ७८ धावांनी विजय मिळवला. CSK चा चालू आयपीएल मोसमातील हा पाचवा विजय ठरला.

Sakshi Dhoni IPL 2024 IPL 2024 : बेबी आने वाला है... साक्षी धोनीची इन्स्टा स्टोरी व्हायरल, याचा नेमका अर्थ काय? चाहते गोंधळात
Sakshi Dhoni IPL 2024 IPL 2024 : बेबी आने वाला है... साक्षी धोनीची इन्स्टा स्टोरी व्हायरल, याचा नेमका अर्थ काय? चाहते गोंधळात (CSK Twitter)

Sakshi Dhoni Instagram Story viral : आयपीएल २०२४ च्या ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने सनरायझर्स हैदराबादचा ७८ धावांनी पराभव केला आणि चालू मोसमातील त्यांचा पाचवा विजय नोंदवला. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये CSK संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २१२ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद १३४ धावा करून ऑलआऊट झाला आणि CSK ने सामना जिंकला.

हा सामना पाहण्यासाठी एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी स्टेडियममध्ये आली होती, तिने सामन्यादरम्यान तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

साक्षीच्या इन्स्टा स्टोरीत काय?

वास्तविक, साक्षी धोनीने सामन्याचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते की, प्लीज आज मॅच लवकर संपवा.बेबी येणार आहे. आणि ही होणाऱ्या मावशीची रिक्वेस्ट आहे.'

विशेष म्हणजे, CSK ने साक्षी धोनीची ही मागणी ऐकली आणि सामना ७ चेंडू आधीच संपवला. साक्षीने स्टोरीत हे कॅप्शन का लिहिले आहे हे अद्याप कळू शकलेले नाही, परंतु तिची ही इन्स्टा स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे.

Sakshi Dhoni Instagram Story
Sakshi Dhoni Instagram Story

सीएसके विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सीएसकेसाठी ऋतुराज गायकवाडने ९८ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १८० होता.

डॅरिल मिशेलने ५२ धावांची खेळी खेळली आणि शिवम दुबेने नाबाद ३९ धावा केल्या आणि एमएस धोनीने २ चेंडूंचा सामना करताना नाबाद ५ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघ १८.५ षटकांत १३४ धावा करत सर्वबाद झाला.

पॉइंट टेबलवर सीएसके तिसऱ्या स्थानावर

आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत, चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. IPL २०२४ च्या गुणतालिकेत CSK संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या