KKR vs DC Dream 11 Prediction : आज कोलकाता-दिल्ली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूला बनवा कर्णधार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs DC Dream 11 Prediction : आज कोलकाता-दिल्ली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूला बनवा कर्णधार

KKR vs DC Dream 11 Prediction : आज कोलकाता-दिल्ली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूला बनवा कर्णधार

Apr 29, 2024 03:28 PM IST

KKR vs DC Dream 11 Prediction : आयपीएलमध्ये आज दिल्ली आणि कोलकाता भिडणार आहेत. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे.

KKR vs DC Dream 11 Prediction : आज कोलकाता-दिल्ली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूला बनवा कर्णधार
KKR vs DC Dream 11 Prediction : आज कोलकाता-दिल्ली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूला बनवा कर्णधार

आयपीएल २०२४  च्या ४७व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहेत. हा सामना आज (२९ एप्रिल) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. KKR संघ आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत एकूण १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआर संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव केला होता. आता केकेआरला हरवून विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचे दिल्ली संघाचे लक्ष्य असेल. 

दरम्यान, कोलकाता असो की दिल्ली, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

KKR vs DC Dream 11 Prediction

यष्टिरक्षक – ऋषभ पंत, फिल सॉल्ट.

फलंदाज – ट्रिस्टन स्टब्स, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, जॅक फ्रेझर मॅकगर्क.

अष्टपैलू - आंद्रे रसेल, सुनील नारायण, अक्षर पटेल.

गोलंदाज - कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

कॅप्टन- जॅक फ्रेझर मॅकगर्क

उपकर्णधार- सुनील नरेन

केकेआर वि. दिल्ली हेड-टू-हेड रेकॉर्ड

केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये एकूण ३२ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये केकेआरने १७ सामने जिंकले आणि दिल्ली कॅपिटल्सने १५ सामने जिंकले. केकेआर आणि दिल्ली यांच्यात झालेल्या शेवटच्या ४ सामन्यांमध्ये दिल्ली संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत.

ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमध्ये झालेल्या शेवटच्या ९ सामन्यांमध्ये केकेआरने ७ सामने जिंकले, तर दिल्लीने २ सामने जिंकले आहेत.

दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स- फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

दिल्ली कॅपिटल्स- दिल्ली कॅपिटल्स- जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

Whats_app_banner