Who Is Arshin Kulkarni: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यापूर्वी सोलापूर येथील एका खेळाडूने लखनौ सुपर जायंट्सकडून (Lucknow Super Giants) आयपीएमध्ये पदार्पण केले, ज्याने अंडर-१९ विश्वचषकात चमकदार केली. अर्शीन कुलकर्णी (Arshin Kulkarni) असे त्या खेळाडूचे नाव आहे.अर्शीनने अंडर- १९ विश्वचषकातील (ICC Under-19 Cricket World Cup) पाच डावात १७४ धावा केल्या आणि चार विकेट्स घेतल्या. या खेळाडूने आपल्या घातक गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना खूप त्रास दिला.
अर्शीन कुलकर्णीचा जन्म १५ फेब्रुवारी २००५ रोजी महाराष्ट्राच्या सोलापूर येथे झाला. अर्शीन त्याच्या आजीसोबत राहतो. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने क्रिकेटला सुरुवात केली. त्याच्या आजीने त्याला सलामी खान क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले. अर्शीनचे आई-वडील पेशाने बालरोगतज्ञ असून ते सोलापुरात हॉस्पिटल चालवतात. सुरुवातीला तो लेगस्पिन गोलंदाजी करायचा, नंतर त्याच्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार त्याने सीम गोलंदाजीचा सराव सुरू केला. एका क्लब गेममध्ये त्याने त्याने हॅट्ट्रिक देखील घेतली, ज्यामुळे तो प्रकाशझोतात आला.
अर्शीन हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचा मोठा चाहता आहे. तो त्याला आपला आदर्श मानतो. या युवा खेळाडूने आपले संपूर्ण बालपण कॅलिसचा खेळ पाहण्यात घालवले. अंडर-१९ वर्ल्डकपपूर्वी कुलकर्णी कॅलिसला भेटला होता. यादरम्यान युवा खेळाडूने माजी क्रिकेटपटूच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्याचवेळी कुलकर्णी यांनी त्यांना त्यांच्या आजीने लिहिलेले पत्रही दाखवले, ज्यामध्ये कॅलिसचा कुलकर्णीच्या कारकिर्दीवर कसा प्रभाव पडला, हे नमूद केले होते.
महाराष्ट्र अंडर-१६ स्पर्धेत त्रिशतक झळकावल्यानंतर हा युवा अष्टपैलू खेळाडू प्रकाशझोतात आला. महाराष्ट्राला गेल्या वर्षी विनू मांकड ट्रॉफी जिंकून देण्यात कुलकर्णीचा मोठा वाटा होता. उपांत्यपूर्व फेरीत त्याने महत्त्वपूर्ण ६० धावा केल्या. तर, अंतिम फेरीत अर्शिनने मुंबईविरुद्ध शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. आयपीएल २०२४ च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यावर २० लाख रुपयांची बोली लावली.
संबंधित बातम्या