T20 WC 2024 India Squad : टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहीर; रोहित शर्मा कर्णधारपदी कायम, हार्दिक पांड्याचं काय? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 India Squad : टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहीर; रोहित शर्मा कर्णधारपदी कायम, हार्दिक पांड्याचं काय? वाचा

T20 WC 2024 India Squad : टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहीर; रोहित शर्मा कर्णधारपदी कायम, हार्दिक पांड्याचं काय? वाचा

Apr 30, 2024 05:06 PM IST

Team India T20 World Cup 2024 Squad Announcement: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी निवड करण्यात आली.

भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आगामी टी-२० विश्वचषकासाठी १५ भारतीय संघाची घोषणा केली.
भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आगामी टी-२० विश्वचषकासाठी १५ भारतीय संघाची घोषणा केली. (AFP)

T20 World Cup 2024: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने टीम इंडियाचे अंतिम रोस्टर सादर केले आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माची कर्णधारपदी निवड करण्यात आली. तर, हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले.

आयपीएल २०२४ संपल्यानंतर काही दिवसांनी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयपीएलफॉर्मचा भारतीय विश्वचषक संघाच्या निवडीवर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु, बीसीसीआयने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला टी-२० विश्वचषक संघातून वगळले. कार अपघातानंतर आयपीएल २०२४ मध्ये सनसनाटी पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतचे कॅरेबियन आणि अमेरिकेतील मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघात पुनरागमन झाले.

GT vs RCB: विल जॅक्स- कोहलीनं गुजरातच्या गोलंदाजीचं कंबरडं मोडलं; १६व्या षटकातच २०६ धावांचं लक्ष्य गाठलं!

पंत हा भारताचा पहिला पर्याय मानला जात आहे. तर, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने एलएसजीचा कर्णधार राहुलला मागे टाकत भारतीय विश्वचषक संघात यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळवले. गेल्या मोसमातील ऑरेंज कॅप विजेता आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. आरआरचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल कर्णधार रोहितसह भारताकडून डावाची सुरुवात करेल.

KKR vs DC : दिल्लीचे सर्वच फलंदाज प्लॉप, कुलदीप यादवची झुंजार खेळी, केकेआरसमोर १५४ धावांचे लक्ष्य

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली. यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये ५०० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला. आयपीएल २०२४ च्या पार्श्वभूमीवर भारताने आशियाई दिग्गज संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराट कोहलीचे भारतीय संघात पुनरागमन झाले होते.

टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव संघ : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग