IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ४७ व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडले. हा सामना कोलकाताचे होम ग्राऊंड असलेल्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात नाइट रायडर्सने शानदार विजयाची नोंद केली.या सामन्यात कोलकाताचा सलामीवीर फिल सॉल्टच्या स्फोटक खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय, त्याने कोलकाताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा तब्बल १४ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात फिल सॉल्टने अवघ्या ३३ चेंडूत ६८ धावांची स्फोटक खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या खेळीदरम्यान त्याने सात चौकार आणि पाच षटकार लगावले. या कामगिरीसह सॉल्टने सौरव गांगुलीचा 14 वर्ष जुना विक्रमही मोडला. आयपीएलच्या एका हंगामात ईडन गार्डन्सच्या मैदानात सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला. यापूर्वी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता. सौरव गांगुलीने २०१० मध्ये ईडन गार्डन्सवर ७ डावात ३३१ धावा केल्या होत्या. सॉल्टने ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांमध्ये १८६ च्या स्ट्राईक रेटने आणि ६८ च्या सरासरीने एकूण ३४४ धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध नाबाद ८९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
२) सौरव गांगुली- ३३१ धावा (२०१०)
३) आंद्रे रसल- ३११ धावा (२०१९)
४) ख्रिस लिन- ३०३ धावा (२०१९)
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १५५ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी केली. सॉल्टने सुनील नारायणसह पॉवरप्लेमध्येच ७९ धावांची भागेदारी केली.सॉल्टने केवळ ३३ चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांसह ६८ धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर सॉल्ट आता आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने नऊ सामन्यात १८० च्या स्ट्राइक रेटने ३९२ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या