Bangladesh Women vs India Women 2nd T20 Live Streaming: भारत आणि बांगलादेश यांच्यात आज दुसरा टी-२० सामना खेळला जाणार आहे. हा सामना शेल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ४४ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहायचा, हे जाणून घेऊयात.
बांगलादेश महिला आणि भारतीय महिला यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज (३० एप्रिल २०२४) शिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-२० सामना भारतातील कोणत्यातीह चॅनेलवर प्रसारित होणार नाही. हा सामना फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रवाहित केला जाईल.
भारतीय महिला आणि बांगलादेश महिला यांच्यात आतापर्यंत एकूण १८ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी १५ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर, बांगलादेशला फक्त तीन सामने जिंकता आले. आकडेवारी पाहता भारतीय संघाचा वरचष्मा दिसून येतो. अशा परिस्थितीत बांगलादेश संघाला घरच्या मैदानावर या मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
दिलारा अक्टर, मुर्शिदा खातून, शोभना मोस्तरी, निगार सुलताना (विकेटकिपर/कर्णधार), फहिमा खातून, शोर्ना अक्टर, राबेया खान, नाहिदा अक्टर, सुलताना खातून, मारुफा अक्टर, फरिहा त्रिस्ना, रुबिया हैदर, शोरिफा खातून, हबीबा इस्लाम , रितू मोनी.
स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकिपर), एस साजना, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, दीप्ती शर्मा, रेणुका ठाकूर सिंह, राधा यादव, दयालन हेमलता, अमनजोत कौर, सायका इशाक, तीतस साधू, आशा शोभना.