IPL 2024: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. लखनौने आतापर्यंत नऊ पैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने नऊ पैकी सहा सामने गमावले असून ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलने सांगितले की, त्यांचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन बदलांसह उतरला आहे. क्विंटन डी कॉकच्या जागी अर्शिन कुलकर्णीला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर मयंक यादवचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांचा भाग होऊ शकला नाही. याशिवाय मुंबई इंडियन्स एका बदलासह खेळताना दिसणार आहे. ल्यूक वुडच्या जागी गेराल्ड कोएत्झीचा संघात समावेश करण्यात आला.
मुंबईच्या संघाला टी-२० चा नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. मुंबई आणि लखनौमध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यापैकी लखनौने तीन सामने जिंकले असून मुंबईने एक सामना जिंकला आहे. गेल्या वर्षी एलिमिनेटरमध्ये मुंबईने लखनौविरुद्धचा एकमेव सामना जिंकला. अर्शिन कुलकर्णी आणि ॲश्टन टर्नर यांना लखनौ सुपर जायंट्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन: इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
इम्पॅक्ट सब: नुवान तुषारा, कुमार कार्तिकेय, डेवाल्ड ब्रेविस, नमन धीर, शम्स मुलानी.
लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग इलेव्हन: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.
इम्पॅक्ट सब: अर्शीन कुलकर्णी, मणिमरण सिद्धार्थ, कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंह, प्रेरक मंकड.