मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sanju Samson : ऑस्ट्रेलियाविरुद्ध संजू सॅमसनला संधी का नाही? BCCI च्या उत्तरानं हैराण व्हाल!

Sanju Samson : ऑस्ट्रेलियाविरुद्ध संजू सॅमसनला संधी का नाही? BCCI च्या उत्तरानं हैराण व्हाल!

Mar 17, 2023, 07:03 PM IST

    • BCCI on sanju samson : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्याबाबत बरीच चर्चा झाली आहे. आता या वादादरम्यान बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे वक्तव्य समोर आले आहे.
Sanju Samson

BCCI on sanju samson : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्याबाबत बरीच चर्चा झाली आहे. आता या वादादरम्यान बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे वक्तव्य समोर आले आहे.

    • BCCI on sanju samson : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्याबाबत बरीच चर्चा झाली आहे. आता या वादादरम्यान बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे वक्तव्य समोर आले आहे.

IND vs AUS 2023 sanju samson : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर संजू सॅमसनबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे. वास्तविक, श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा होती, मात्र निवडकर्त्यांनी संजू सॅमसनच्या निवडीबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

आता इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी संजू सॅमसनच्या उपलब्धतेबाबत एक विधान केले आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संजू सॅमसन एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि सध्या तो दुखापतीतून सावरत आहे.

बीसीसीआयचं संजू सॅमसनबाबत मोठे वक्तव्य

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संजू सॅमसन अजूनही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) दुखापतीतून सावरत आहे. पहिल्या वनडेसाठी तो उपलब्ध नाही. श्रेयस अय्यरऐवजी संजू सॅमसनचा संघात समावेश करायचा की नाही याबाबत निवडकर्ते निर्णय घेतील. पण एवढं व्यस्त वेळापत्रक पाहता संजू सॅमसन दुसऱ्या वनडेसाठी उपलब्ध असेल असं वाटत नाही".

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करत आहे. शुभमन गिल आणि इशान किशन सलामीसाठी संघात आहेत, तर मधल्या फळीची जबाबदारी विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्या खांद्यावर आहे. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या रूपाने दोन फिरकीपटूही संघात आहेत. त्याचबरोबर या सामन्यात भारतीय संघाने चार प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याला घेऊन मैदानात उतरले आहे.

भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले पण ते ३५.४ षटकात केवळ १८८ धावा करून सर्वबाद झाले. मात्र, पाहुण्या संघाने आपल्या डावाची सुरुवात चांगली केली. एका क्षणी मिचेल मार्शने चौकार आणि षटकारांची फटकेबाजी केली होती, पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून त्यांना २०० पेक्षा कमी धावसंख्येपर्यंत रोखले.