मराठी बातम्या  /  Sports  /  Ind Vs Ire Odi Series India And Ireland Are Set To Play Odi Series Before World Cup 2023 Here Know The Details Ind Vs Ire Odi Series

IND vs IRE ODI Series : टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार, वेळापत्रक जाहीर

IND vs IRE ODI Series shedule
IND vs IRE ODI Series shedule
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Mar 17, 2023 05:17 PM IST

IND vs IRE ODI Series 2023 schedule : यंदा भारतीय भूमीवर विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे.

icc ODI world cup 2023 : भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील ही एकदिवसीय मालिका १८ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे. तथापि, हे सलग दुसरे वर्ष असेल जेव्हा भारतीय क्रिकेट संघ आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यापूर्वी २०२२ मध्येही भारत आणि आयर्लंड यांच्यात २ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली होती. या मालिकेत यजमान आयर्लंडने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कडवी झुंज दिली होती.

ट्रेंडिंग न्यूज

आयर्लंड भारत आणि बांगलादेश विरुद्ध वनडे मालिका खेळणार

त्याचबरोबर भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी आयर्लंडचा संघ बांगलादेशविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका विश्वचषक सुपर लीगचा भाग असेल. म्हणजेच विश्वचषक पात्रतेच्या दृष्टीने दोन्ही संघांमधील मालिका खूपच महत्त्वाची ठरणार आहे.

वास्तविक, एकदिवसीय विश्वचषक यंदा ऑक्टोबर महिन्यात खेळवला जाणार आहे. यावेळी भारतीय भूमीवर विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. मात्र, विश्वचषक पात्रतेच्या दृष्टीने आयर्लंड-बांगलादेश मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

वर्ल्डकपसाठी बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकावी लागेल

वर्ल्डकप सुपर लीगबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे, मात्र आयर्लंड संघाला बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकून पात्रता मिळवायची आहे. अशा स्थितीत आयर्लंडला विश्वचषकासाठी पात्रता मिळवणे सोपे जाणार नाही. वास्तविक, जर आयर्लंड संघाने बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका ३-० ने जिंकली तर ते विश्वचषकासाठी पात्र ठरू शकतात.

त्याचवेळी, भारत-आयर्लंड मालिकेत हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचे मानले जात आहे. याआधी जेव्हा दोन संघांमध्ये २ वनडे सामन्यांची मालिका खेळली गेली तेव्हा त्या भारतीय संघाचा कर्णधारही हार्दिक पांड्या होता.

WhatsApp channel