मराठी बातम्या  /  Sports  /  Sachin Tendulkar On Bcci President Will You Also Become The Bcci Chief Like Sourav Ganguly Sachin Tendulkar Told Funny Story

Sachin Tendulkar : बीसीसीआयचा अध्यक्ष होणार का? सचिननं गांगुलीची फिरकी घेत दिलं उत्तर

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Mar 17, 2023 04:45 PM IST

Sachin Tendulkar on bcci president : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर एका चॅनेलच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. सचिनने येथे अनेक मुद्यांवर आपले मत मांडले. सोबतच तो भविष्यात बीसीसीआयचा अध्यक्ष होणार का? या प्रश्नाचेही उत्तर दिले. या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने एक मजेशीर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर एका चॅनेलच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी मुलाखत घेणाऱ्यांनी त्याला बीसीसीआचा अध्यक्ष होण्याबाबत प्रश्न विचारला. यावर सचिनने मजेशीर उत्तर दिले.

ट्रेंडिंग न्यूज

भारताचे माजी क्रिकेटपटू हे सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष बनण्याचा ट्रेंड सुरु आहे. आधी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळले. आता १९८३ वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य रॉजन बिन्नी हे बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

यानंतर सचिन आता या पदावर कधी येईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सचिन तेंडुलकरने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला की, “मी त्यांच्यासारखा (रॉजर बिन्नी, सौरव गांगुली मध्यमगती गोलंदाज होते) वेगवान गोलंदाजी करत नाही. सचिन इथेच थांबला नाही. आपला मुद्दा पुढे मांडत तो म्हणाला की, एका दौऱ्यावर विकेट घेतल्यावर दादाने मला सांगितले की मी १४० किमी प्रतितास पर्यंत जाऊ शकतो. यावर मी म्हणालो ठीक आहे. गांगलीने दोन दिवस कष्ट घेतले आणि मग कंबर धरून बसला".

सचिन पुढे हसला आणि म्हणाला, "मी वेगवान गोलंदाज नाही. मी १४० किमी प्रतितास गोलंदाजी करू शकत नाही. या संपूर्ण स्टोरीचा मुद्दा असा आहे की सचिन तेंडुलकर बीसीसीआय प्रमुख होण्याच्या प्रश्न टोलवून लावला आहे.

मास्टर ब्लास्टरला बीसीसीआयमध्ये आणण्यासाठी सौरव गांगुलीने अनेक वेळा प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही. बीसीसीआयचा प्रमुख असताना गांगुलीने सचिनसाठी एक योजना असल्याचेही सांगितले होते. राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आणि व्हीव्हीएस लक्ष्मणकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी आली, पण सचिनने स्वतःला दूर ठेवण्यात यश मिळवले. मात्र, सचिन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या