मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sanju Samson : संजू सॅमसन रजनीकांतच्या भेटीला, ७व्या वर्षी आई-वडिलांना सांगितलेलं खरं ठरलं

Sanju Samson : संजू सॅमसन रजनीकांतच्या भेटीला, ७व्या वर्षी आई-वडिलांना सांगितलेलं खरं ठरलं

Mar 13, 2023, 12:17 PM IST

    • sanju samson meet Rajinikanth : टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो संजूने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो वेगाने व्हायरल झाला आहे. 
sanju samson meet Rajinikanth

sanju samson meet Rajinikanth : टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो संजूने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो वेगाने व्हायरल झाला आहे.

    • sanju samson meet Rajinikanth : टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो संजूने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो वेगाने व्हायरल झाला आहे. 

sanju samson & Rajinikanth photo : टीम इंडियाचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. आता त्याने एक नवा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. संजूने सुपरस्टार रजनीकांतसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो चाहत्यांना खूपच आवडलेला दिसत आहे. फोटोवर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

हा फोटो पोस्ट करताना संजूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी रजनीकांतचा चाहता होतो... वयाच्या ७ व्या वर्षी मी माझ्या आई-वडिलांना सांगितले होते की, एके दिवशी मी रजनी सरांना त्यांच्या घरी जावून भेटेन. २१ वर्षांनंतर तो दिवस आला आहे. 'थलैवा'ने मला त्यांच्या घरी भेटायला बोलावले आहे.”

संजूचा वनडे टीममध्ये समावेश?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या जागी संजू सॅमसनला संघात स्थान मिळू शकते. वनडे मालिका १७ मार्चपासून सुरू होणार आहे. संजूने शेवटचा वनडे नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरच्या जागी संजूचा संघात समावेश केला जाऊ शकतो. सुंजने आतापर्यंत एकूण ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना ६६ च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ अर्धशतके झळकावली आहेत.

श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यर पाठदुखीचा त्रास सुरु झाला. यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. आता तो कसोटी सामन्यूतन बाहेर पडला तसेच, या कसोटीनंतर होणाऱ्या वनडे मालिकेतूनही श्रेयस बाहेर होऊ शकतो.