IPL 2024: लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज आयपीएल २०२४ मधील ४८वा सामना खेळला जाणार आहे. लखनौच्या इकान क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. चालू मोसमात लखनौ आणि मुंबईचा संघ प्रथमच एकमेकांशी भिडणार आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. लखनौला त्यांच्या गेल्या सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. एलएसजीने आतापर्यंत नऊ पैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने नऊ पैकी सहा सामने गमावले असून ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थानविरुद्धच्या गेल्या दोन सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला. हार्दिक ब्रिगेड मंगळवारी पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचा प्रयत्न करेल. आणखी एक पराभव मुंबईच्या प्लेऑफच्या मार्गात काटा आणेल.
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज (३० एप्रिल २०२४) आयपीएलमधील ४८ वा सामना खेळला जाईल. हा सामना लखनौ भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, लखनौ आणि मुंबई यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकिपर, कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर, अमित मिश्रा, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, मणिमरन सिद्धार्थ, युधवीर सिंग चरक, मयंक यादव, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, प्रेरक मंकड, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, अर्शद खान, शामर जोसेफ.
इशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, नमन धीर, शम्स मुलानी, देवाल्ड ब्रेविस, कुमार कार्तिकेय, श्रेयस गोपाल, हार्विक देसाई, जेराल्ड कोएत्झी, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, क्वेना मफाका.