मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sanju Samson: संजू सॅमसनची कमाल, रणजी ट्रॉफीच्या ‘या’ मोसमात ठोकले सर्वाधिक षटकार

Sanju Samson: संजू सॅमसनची कमाल, रणजी ट्रॉफीच्या ‘या’ मोसमात ठोकले सर्वाधिक षटकार

Dec 28, 2022, 09:50 PM IST

    • Ranji Trophy Sanju Samson: रणजी ट्रॉफी २०२२-२३ मध्ये संजू सॅमसन उत्कृष्ट लयीत दिसत आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक ११ षटकार मारले आहेत.
Sanju Samson ranji trophy

Ranji Trophy Sanju Samson: रणजी ट्रॉफी २०२२-२३ मध्ये संजू सॅमसन उत्कृष्ट लयीत दिसत आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक ११ षटकार मारले आहेत.

    • Ranji Trophy Sanju Samson: रणजी ट्रॉफी २०२२-२३ मध्ये संजू सॅमसन उत्कृष्ट लयीत दिसत आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक ११ षटकार मारले आहेत.

रणजी ट्रॉफी २०२२-२३ मध्ये केरळचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन उत्कृष्ट लयीत दिसत आहे. रणजीच्या या मोसमात आतापर्यंत संजूने सर्वाधिक ११ षटकार मारले आहेत. त्याने अवघ्या २ सामन्यांच्या ४ डावात या षटकारांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने २३८ धावा केल्या आहेत. या शानदार कामगिरीनंतरही त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचा भाग बनवण्यात आले नाही. संजूला फक्त T20 मालिकेचा भाग आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

रणजीच्या या मोसमात संजूने आतापर्यंत दोन सामन्यांच्या चार डावांत ३ अर्धशतके झळकावली आहेत. झारखंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ७२ धावांची खेळी केली. यानंतर राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ८२ धावा आणि दुसऱ्या डावात ६९ धावा केल्या.

ऑगस्टमध्ये खेळला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना

संजू सॅमसनने ऑगस्ट २०२२ मध्ये शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने हा सामना वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळला होता. यानंतर न्यूझीलंड दौऱ्यातही संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आले नव्हते.

संजू सॅमसनचे आंतरराष्ट्रीय करिअर

संजूने आतापर्यंत भारतीय संघासाठी ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ६६.०० च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने १६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २१.१४ च्या सरासरीने आणि १३५.१५ च्या स्ट्राइक रेटने २९६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक अर्धशतक झळकावले आहे.