मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Watch: हे स्किल फक्त धोनीकडं होतं; पण ‘या’ विकेटकीपरनं तर कमालच केली, एकदा पाहाच!

Watch: हे स्किल फक्त धोनीकडं होतं; पण ‘या’ विकेटकीपरनं तर कमालच केली, एकदा पाहाच!

Dec 28, 2022, 05:14 PM IST

    • wicketkeeper arjun saud in nepal t20 league video: नेपाळ टी-20 लीगमध्ये विराटनगर सुपर किंग्ज आणि जनकपूर रॉयल्स यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यात विराटनगर सुपर किंग्जचा यष्टिरक्षक अर्जुन सौदने विकेटकिपिंगचा अप्रतिम नमुना सादर केला. त्याची ही स्टाईल पाहिल्यानंतर चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली.
arjun saud wicket keeper

wicketkeeper arjun saud in nepal t20 league video: नेपाळ टी-20 लीगमध्ये विराटनगर सुपर किंग्ज आणि जनकपूर रॉयल्स यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यात विराटनगर सुपर किंग्जचा यष्टिरक्षक अर्जुन सौदने विकेटकिपिंगचा अप्रतिम नमुना सादर केला. त्याची ही स्टाईल पाहिल्यानंतर चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली.

    • wicketkeeper arjun saud in nepal t20 league video: नेपाळ टी-20 लीगमध्ये विराटनगर सुपर किंग्ज आणि जनकपूर रॉयल्स यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यात विराटनगर सुपर किंग्जचा यष्टिरक्षक अर्जुन सौदने विकेटकिपिंगचा अप्रतिम नमुना सादर केला. त्याची ही स्टाईल पाहिल्यानंतर चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली.

wicketkeeper arjun saud viral video: क्रिकेट विश्वात जेव्हा जेव्हा विकेटकीपिंगचा विषय येतो तेव्हा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (ms dhoni) उल्लेख नक्कीच होतो. धोनीची विकेटकीपिंग स्टाईल वेगळीच होती. त्याच्या विकेटकिपिंग स्टाईलची अनेकदा चर्चा होत असते. विकेटच्या मागे उभा राहून तो संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकायचा. आता असाच एक विकेटकिपिंगचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेपाळ टी-20 लीगचा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

नेपाळ टी-20 लीगमध्ये विराटनगर सुपर किंग्ज आणि जनकपूर रॉयल्स यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यात विराटनगर सुपर किंग्जचा यष्टिरक्षक अर्जुन सौदने विकेटकिपिंगचा अप्रतिम नमुना सादर केला. त्याची ही स्टाईल पाहिल्यानंतर चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली. विकेटकीपर अर्जुन सौदने सामन्यात दोन फलंदाजांना धावबाद केले. हे रनआऊटचे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जनकपूर रॉयल्सचा फलंदाज वॉल्टन चेंडू डिफेन्स करून धाव घेण्याच्या प्रयत्नात आहे. पण क्षेत्ररक्षण करणाऱ्या सिकंदर रझाने चेंडू पटकन हातात घेऊन विकेटकीपर अर्जुन सौदच्या दिशेने फेकला. मात्र, हा थ्रो थोडा वाईड गेला. त्यामुळे विकेटकीपर अर्जुन सौदला हवेत झेप घेऊन हा चेंडू पकडावा लागला. त्याने चेंडू पकडलाही आणि स्टम्प्सवर मारला. अशाप्रकारे फलंदाज बाद झाला.

यानंतर कॉमेंटेटर्सनाही अर्जुन सौदची ही स्टाईल खूपच भावली. विकेटकिपिंगच्या या स्टाईलवर कॉमेंटेटर म्हणलाा की, 'वाह यंगमॅन, हे पाहिल्यानंतर महेंद्रसिंग धोनीलाही तुझा अभिमान वाटेल".

दरम्यान, हा प्रसंग डावाच्या ९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर घडला. त्यानंतर याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्जुनने पुन्हा एकदा आपली शानदार विकेटकीपिंग दाखवली. यावेळी फलंदाजाने मोठा फटका खेळून पहिली धाव घेतली. तेवढ्यात फिल्डरकडून मिस फिल्डिंग होते. हे पाहून फलंदाज दुसऱ्या धावेसाठी धावतो. मात्र, तेवढ्यात फिल्डर चेंडू हातात घेतो आणि विकेटकीपरच्या दिशेने फेकतो. विकेटकीपर अर्जुन सौद चेंडू पकडतो आणि आपल्या दोन्ही पायांच्या मधून तो स्टम्सवर मारतो. फलंदाज धावबाद होतो. धोनीची ही स्टाईल चाहत्यांनी अनेकदा पाहिली असेल. विकेटकीपर अर्जुन सौदचे हे दोन्ही रनआउट्स पाहिल्यानंतर धोनी नजरेसमोर येतो.

पुढील बातम्या