मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Women's T20 WC 2023: टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

Women's T20 WC 2023: टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

Dec 28, 2022, 09:24 PM IST

    • Indian Team For Women's T20 World Cup 2023: T20 विश्वचषकात भारतीय संघ १२ फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. ग्रुप-२ मध्ये टीम इंडियासह इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंडचे संघ आहेत.
Women's T20 WC 2023

Indian Team For Women's T20 World Cup 2023: T20 विश्वचषकात भारतीय संघ १२ फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. ग्रुप-२ मध्ये टीम इंडियासह इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंडचे संघ आहेत.

    • Indian Team For Women's T20 World Cup 2023: T20 विश्वचषकात भारतीय संघ १२ फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. ग्रुप-२ मध्ये टीम इंडियासह इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंडचे संघ आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (२८ डिसेंबर) महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्मृती मानधना हिची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १० फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेत हा टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेत जानेवारीत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

T20 विश्वचषकात भारतीय संघ १२ फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. ग्रुप-२ मध्ये टीम इंडियासह इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड आहेत. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेचा अंतिम सामना २६ फेब्रुवारी रोजी केपटाऊन येथे खेळवला जाईल.

भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर (फिटनेसवर अवलंबून), राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

राखीव खेळाडू : सबिनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.

पूजा वस्त्राकरला विश्वचषक संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु तिला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. जर पूजा फिटनेस टेस्टमध्ये फेल झाली तर तिच्या जागी मेघना सिंगला संधी दिली जाऊ शकते.

दरम्यान, या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया तीन देशांच्या तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहे. ही तिरंगी मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये भारताशिवाय दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ सहभागी होणार आहेत.

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरंजामी वर्मा (विकेट-कीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, सब्बिनेनी मेघना, स्नेह राणा, शिखा पांडे.

पुढील बातम्या