मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hardik Pandya: आयपीएल ट्रॉफी जिंकली, टीम इंडियाचा कॅप्टन बनला; हार्दिकसाठी गोल्डन इयर ठरलं हे वर्ष

Hardik Pandya: आयपीएल ट्रॉफी जिंकली, टीम इंडियाचा कॅप्टन बनला; हार्दिकसाठी गोल्डन इयर ठरलं हे वर्ष

Dec 28, 2022, 05:50 PM IST

    • hardik pandya in 2022: हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष खूप छान गेले आहे. या वर्षी त्याला तिसऱ्यांदा भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. यावर्षी त्याने आयपीएल ट्रॉफीदेखील जिंकली आहे.
Hardik Pandya

hardik pandya in 2022: हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष खूप छान गेले आहे. या वर्षी त्याला तिसऱ्यांदा भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. यावर्षी त्याने आयपीएल ट्रॉफीदेखील जिंकली आहे.

    • hardik pandya in 2022: हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष खूप छान गेले आहे. या वर्षी त्याला तिसऱ्यांदा भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. यावर्षी त्याने आयपीएल ट्रॉफीदेखील जिंकली आहे.

भारतीय क्रिकेट संघासाठी २०२२ हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले होते. आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण चाहत्यांची निराशा झाली. टी-20 वर्ल्डकपमध्येदेखील तेच घडले. मात्र, हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष अतिशय चांगले राहिले आहे. २०२२ मध्ये हार्दिक पंड्याचे नशीब उजळले आहे. या वर्षी त्याने आपल्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवले. तसेच, या वर्षात त्याला तिसऱ्यांदा टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. हे वर्ष त्याच्यासाठी 'गोल्डन इयर' ठरले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गुजरातला आयपीएल चॅम्पियन बनवले

IPL २०२२ मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ या स्पर्धेत सामील झाले. यातील गुजरात टायटन्सची कमान हार्दिक पांड्याकडे होती. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली पदार्पणातच गुजरात टायटन्सला आयपीएल २०२२ चे विजेतेपद मिळवून दिले. केवळ कॅप्टन्सीच नाही तर बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली. आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करण्यातही तो चौथ्या क्रमांकावर होता. त्याने १५ सामन्यात ४४.२७ च्या सरासरीने आणि ४८७ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ अर्धशतके झळकावली.

आयर्लंड आणि न्युझीलंडविरुद्धची मालिका जिंकून दिली

त्यानंतर जूनमध्ये भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर पहिल्यांदा हार्दिककडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. या मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला. तर टी-२० वर्ल्डकपनंतर भारत न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील टी-२० मालिकेचा कर्णधार हार्दिक पांड्या होता. या मालिकेतही भारताने विजय मिळवला.

यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या टी- २० मालिकेसाठीही हार्दिक पांड्या कर्णधार असेल. एवढेच नाही तर हार्दिक भारतीय टी-२० संघाचा कायमस्वरूपी कर्णधार बनू शकतो, असेही बोलले जात आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे.

पुढील बातम्या