मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GT Vs RCB : गुजरातची प्रथम फलंदाजी, आरसीबीच्या संघात मोठे बदल, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन

GT Vs RCB : गुजरातची प्रथम फलंदाजी, आरसीबीच्या संघात मोठे बदल, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 28, 2024 03:10 PM IST

GT Vs RCB IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये आज गुजरात आणि आरसीबी आमनेसामने आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

GT Vs RCB : गुजरातची प्रथम फलंदाजी, आरसीबीच्या संघात मोठे बदल, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन
GT Vs RCB : गुजरातची प्रथम फलंदाजी, आरसीबीच्या संघात मोठे बदल, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन

आयपीएल २०२४ चा ४५ वा सामना आज (२८ एप्रिल) गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. तर गुजरात टायटन्स कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल.

इम्पॅक्ट सब: अनुज रावत, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, आकाश दीप, विजयकुमार वैश.

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.

इम्पॅक्ट सब: संदीप वारियर, शरथ बीआर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर.

गुजरात वि. आरसीबी हेड टू हेड

 गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे दोन्ही संघ आतापर्यंत ३ वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये गुजरात संघाने २ वेळा विजय मिळवला आहे. तर एक सामना आरसीबीने जिंकला आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असताना शुभमन गिलकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

पीच रिपोर्ट

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये समान स्पर्धा पाहायला मिळते. दिवसा सामना खेळला जात असल्याने फिरकीपटूंची भूमिका खूप महत्त्वाची ठरते, सामना सुरू होण्याच्या वेळी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असू शकते, अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. जेणेकरून पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता येईल.

त्याच वेळी, दुसऱ्या डावात खेळपट्टी थोडी संथ असू शकते, अशा परिस्थितीत जलद धावा करणे सोपे काम नाही. या मैदानावर दुपारच्या सामन्यात १८० हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करणे अद्याप सोपे काम ठरलेले नाही.

IPL_Entry_Point