मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sleeping Habits: रात्री झोपताना फोन जवळ का ठेवू नये? ही आहेत कारणं

Sleeping Habits: रात्री झोपताना फोन जवळ का ठेवू नये? ही आहेत कारणं

Jun 03, 2023, 11:16 PM IST

    • Health Care Tips: तुम्हाला सुद्धा फोन जवळ ठेवून झोपायची सवय आहे? सावध व्हा! या सवयीमुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. जाणून घ्या सविस्तर.
मोबाईल जवळ घेऊन का झोपू नये (unsplash)

Health Care Tips: तुम्हाला सुद्धा फोन जवळ ठेवून झोपायची सवय आहे? सावध व्हा! या सवयीमुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. जाणून घ्या सविस्तर.

    • Health Care Tips: तुम्हाला सुद्धा फोन जवळ ठेवून झोपायची सवय आहे? सावध व्हा! या सवयीमुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. जाणून घ्या सविस्तर.

Why You Should Not Sleep With Your Phone: अनेक लोकांना रात्री झोपताना शेजारी किंवा उशीच्या खाली फोन ठेवून झोपायची सवय असते. रात्री मोबाईलवर सर्फिंग करता करता झोप लागते किंवा रात्री मोबाईल पाहताना झोप येत असेल तर मोबाईल शेजारी ठेवला जातो. शिवाय अनेक लोक सकाळी उठल्यावर वेळ पाहण्यासाठी सोयीचे जाते म्हणून सुद्धा मोबाईल जवळ घेऊन झोपतात. तर बहुतांश लोक मोबाईल मध्ये अलार्म लावत असल्याने ते झोपताना उशीच्या बाजूला किंवा खाली ठेवतात. पण हे तुमच्यासाठी अजिबात चांगली सवय नाहीये.

ट्रेंडिंग न्यूज

Veg Roll: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा ब्रेडपासून बनलेले व्हेज रोल, सर्वांना आवडेल ही रेसिपी

International No Diet Day 2024: कुटूंब आणि मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेण्याचे आहेत हे फायदे!

Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय

Joke of the day : दहा नारळांमधील सात नारळ नासले तर किती शिल्लक राहतील असं जेव्हा गुरुजी विचारतात…

मोबाईल जवळ घेऊन न झोपण्याचे कारणं

१. स्लीप सायकल डिस्टर्ब होते

हार्वर्ड हेल्दी स्टडीतून असे दिसून आले आहे की, फोनमधली निळा प्रकार तुमच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतो. स्मार्टफोनमधील निळा प्रकाश मेलाटोनिनचे उत्पादन रोखू शकतो, हा हार्मोन जो तुमच्या झोपेचे नियमन करण्यास मदत करतो . यामुळे लवकर झोप येत नाही किंवा नीट शांत झोप लागत नाही.

२. मानसिक आरोग्यावर होतो नकारात्मक परिणाम

जेव्हा तुम्हाला कमी झोप येते, तेव्हा तुमचे शरीर कॉर्टिसॉलचे स्तर वाढवते. हे एक स्ट्रेस हार्मोन आहे, ज्यामुळे मूडी स्वभाव आणि चिडचिड होऊ शकते. यामुळे तुम्हाला चिंता आणि नैराश्य सारख्या विकारांचा देखील धोका असतो.

३. कॅन्सरचा धोका

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या सुरुवातीच्या अभ्यासात कर्करोग आणि सेलफोन यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकण्यात आला. आपण झोपताना शरीर जे रेडिएशन शोषू शकते ते खूप धोकादायक असते. त्याने कर्करोग होण्याची शक्यता असते, विशेषतः ब्रेन ट्युमर.

४. वजन वाढण्याचा धोका

नीट झोप न होणे आणि वजन वाढणे यांचा जवळचा संबंध आहे. जेव्हा तुमची रात्रीची झोप नीट होत नाही तेव्हा गेर्लिन आणि लेप्टिन हे भूक नियंत्रित करणारे हार्मोन यांचे संतुलन पूर्णपणे बिघडते. यामुळे लठ्ठपणा होऊ शकतो. कारण लोक उर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी लोक जास्त खातात.

५. स्फोट होण्याचा किंवा आगीचा धोका

हे फार क्वचित घडत असले तरी फोनच्या बॅटरीचा स्फोट किंवा आगर लागण्याचा धोका असतो. जास्त गरम झालेल्या आणि जळणाऱ्या बॅटरीचा सेकंड-डिग्री बर्न्सच्या अनेक प्रकरणांशी संबंध आहे, असे अलीकडच्या आरोग्य लेखात नोंदवले गेले.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग