मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sleep Talking: तुम्हीही झोपेत बडबड करता का? ही आहेत याची कारणे आणि उपाय

Sleep Talking: तुम्हीही झोपेत बडबड करता का? ही आहेत याची कारणे आणि उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 27, 2023 11:10 PM IST

Causes and Treatments: जे लोक झोपेत बोलतात त्यांच्या लक्षातही येत नाही आणि दुसऱ्या दिवशी काही आठवत नाही. झोपेत बोलणारा व्यक्ती एका वेळी ३० सेकंदांपेक्षा जास्त बोलत नाही.

झोपेत बडबड करण्याचे कारण
झोपेत बडबड करण्याचे कारण

Why do Some People Talk in Their Sleep: तुमचा पार्टनर रात्री झोपेत बोलतो का? तुमच्या जोडीदाराच्या झोपेत बोलण्याच्या सवयीमुळे तुमची झोप खराब झाली आहे का? जर उत्तर होय असेल तर हे जाणून घ्या की झोपेत स्वप्न पाहताना बोलणे सामान्य नसून एक प्रकारचा पॅरासोमनिया आहे म्हणजे - झोपताना अनैसर्गिक वागणे. मात्र डॉक्टर या समस्येला आजार मानत नाहीत आणि सामान्य श्रेणीत ठेवत नाहीत. डॉक्टरांना झोपेच्या बोलण्याबद्दल फारशी माहिती नसते. दुसरीकडे झोपेत बोलणाऱ्यांना ते कळत नाही आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काही आठवतही नाही. झोपेत बोलणारी व्यक्ती एकावेळी ३० सेकंदांपेक्षा जास्त बोलू शकत नाही आणि काही वेळ बोलल्यानंतर शांत होते. अशा परिस्थितीत काही लोक झोपेत का बडबडतात आणि या समस्येवर मात करण्याचे उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.

कोणाला असते झोपेत बडबडायची सवय?

एका संशोधनानुसार ३ ते १० वर्षे वयोगटातील निम्म्याहून अधिक मुले झोपेत त्यांचे बोलणे पूर्ण करतात. त्याच वेळी ५ टक्के प्रौढ त्यांच्या झोपेत बोलतात. इतकेच नाही तर संशोधनानुसार, झोपेत मुलांपेक्षा जास्त मुली बोलतात.

झोपेत बोलण्याची कारणे

तणाव, नैराश्य, झोप न लागणे, थकवा जाणवणे, दारू किंवा कोणत्याही औषधामुळे, ताप येणे या कारणामुळे झोपेत बोलू शकतात. या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील एखाद्याला झोपेत बोलण्याची सवय असेल तर त्यामुळे देखील झोपेच्या विकाराची समस्या उद्भवू शकते.

झोपेत बोलण्याच्या समस्येवर उपचार

तणाव

झोपेत बोलण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तणाव. जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर तुम्हाला ही समस्या असू शकते. हे टाळण्यासाठी मनाला विश्रांती द्या. तुम्ही खूप व्यस्त असाल तर थोडा वेळ स्वतःसाठी काढून फिरायला जा.

आरईएम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर

झोपताना ओरडणे, रडणे किंवा हात पाय हलवण्याची सवय देखील स्मृतिभ्रंश (निद्रानाश) किंवा पार्किन्सन्स सारख्या आजारांची लक्षणे असू शकतात. या आजाराला 'REM स्लीप बिहेवियर डिसऑर्डर' म्हणतात. आरईएम म्हणजे झोपेचा टप्पा. झोपेत किंवा स्वप्नात जे काही घडत असेल ते आपल्याला खरे समजू लागते. आरईएम व्यतिरिक्त औषधांच्या प्रतिक्रिया, तणाव, मानसिक आरोग्य समस्यांमुळे देखील लोक त्यांच्या झोपेत बोलू शकतात.

वेळेवर झोपा

वेळेवर झोपणे आणि उठणे यामुळे झोपेत बडबड करण्याची सवय सुटू शकते. असे केल्याने तुमची झोप पूर्ण होते. लक्षात ठेवा झोप पूर्ण होत नाही तेव्हाही ही समस्या उद्भवते.

व्यायाम

अनेकदा शरीरात योग्य रक्ताभिसरण न झाल्यामुळे व्यक्ती झोपेत बडबड करू लागते. अशा परिस्थितीत या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आणि शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी नियमित योगासने आणि व्यायाम करा.

मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्या

हे सर्व उपाय करूनही तुमची समस्या कायम राहिल्यास चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग