मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cold Milk Benefits: उन्हाळ्यात गरम नाही तर प्या थंड दूध, मिळतील अनेक फायदे

Cold Milk Benefits: उन्हाळ्यात गरम नाही तर प्या थंड दूध, मिळतील अनेक फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 24, 2023 06:45 PM IST

Summer Health Care Tips: दुधामध्ये असणाऱ्या अनेक पोषक तत्त्वांमुळे दुध पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्यात गरम दुधाऐवजी थंड दूध पिले पाहिजे. त्याचे काय फायदे होतात, ते जाणून घ्या.

उन्हाळ्यात थंड दूध पिण्याचे फायदे
उन्हाळ्यात थंड दूध पिण्याचे फायदे

Benefits of Drinking Cold Milk in Summer: दूध हे बहुधा भारतीय घरांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे डेयरी प्रोडक्ट आहे. लहान मुलाच्या आहाराचा एक ग्लास दूध हा महत्त्वाचा भाग आहे आणि प्रौढांसाठीही ते तितकेच महत्त्वाचे आहे. प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियमने समृद्ध असलेले दूध हे पोषक तत्वांचे भांडार आहे. पण उन्हाळा आहे, अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्ट खाण्याआधी दोनदा विचार करायला हवा, कारण कधी नुकसान होईल हेच कळत नाही.

तुम्हाला सुद्धा सकाळी गरम दूध पिण्याची सवय आहे? तर तुम्हाला ही सवय भारी पडू शकते. दिवसा किंवा उन्हाळ्यात थंड दूध पिणे जास्त फायदेशीर आहे. हे पिल्याने शरीरातील उष्णता संपून शरीर आतून थंड होते. दूध नेचरमध्ये थंडगार असल्याने ते प्यायल्याने शरीर थंड राहते. दूध हे संपूर्ण पोषक तत्व आहे, जे शरीराच्या गरजेनुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियमची गरज पूर्ण करते. निरोगी राहण्यासाठी दुधाचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात थंड दूध पिण्याचे काय फायदे आहे, जाणून घ्या.

पोटाची जळजळ शांत होते

जर तुम्हाला अनेकदा पोटात जळजळ, अॅसिडिटी आणि अल्सरचा त्रास होत असेल तर थंड दूध हा उत्तम उपाय आहे. जर तुम्हाला पचनाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल, तर तुम्ही एक ग्लास थंड दुधात एक चमचा इसबगोल टाकू शकता, कारण ते बद्धकोष्ठता आणि अॅसिड रिफ्लक्सपासून आराम देते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

थंड दूध खरोखर वजन कमी करण्यास मदत करते. थंड दुधात कॅल्शियम असल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. अशा प्रकारे जास्त कॅलरीज बर्न होतात. एक ग्लास दूध प्यायल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि अनावश्यक स्नॅकिंग टाळण्यास देखील मदत होते.

हेल्दी स्किनसाठी

थंड दूध इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते जे तुमच्या शरीराला डिहायड्रेशनशी लढण्यास मदत करू शकते. हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवेल आणि त्वचा चमकदार ठेवेल. थंड दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी. आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कच्चे थंड दूध देखील लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel