मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Onion Benefits: ब्लड शुगरपासून हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कांदा, जाणून घ्या कसा खावा

Onion Benefits: ब्लड शुगरपासून हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कांदा, जाणून घ्या कसा खावा

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 27, 2023 12:35 PM IST

Healthy Eating Tips: कांदा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाचे रुग्ण आणि पक्षाघाताच्या रुग्णांसाठी कांदा खाणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते. अधिक फायदे मिळवण्यासाठी कसे खावे हे जाणून घ्या.

कांदा खाण्याचे फायदे
कांदा खाण्याचे फायदे

Health Benefits of Eating Onion: कांदा हा भारतीय स्वयंपाकघरातील एक खास भाग आहे. ज्याचा वापर जवळपास प्रत्येक भाजी आणि डाळीमध्ये केला जातो. मग ती ग्रेव्ही बनवायची असो वा तडका. अनेकांना कांदा कमी खायला आवडतो. विशेषतः कच्च्या कांद्याचा वास बर्‍याच लोकांना आवडत नाही. पण कांद्याचे आरोग्यदायी गुणधर्म जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच तो खाण्यास सुरुवात कराल. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की कांद्यामध्ये असे अनेक घटक असतात जे हृदयाच्या आरोग्यापासून ते स्ट्रोकच्या धोक्यापर्यंत संरक्षण देतात. दुसरीकडे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कांदा आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया कांदे खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात.

ट्रेंडिंग न्यूज

रक्तातील साखर नियंत्रित करते

मधुमेहामध्ये सल्फरसोबत क्वारॅक्टिन हे संयुग आढळते, जे रक्तातील साखर कमी करण्यासोबतच इन्सुलिनची पातळी सुधारते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की टाइप २ मधुमेहामध्ये सुमारे चार आठवडे कांद्याचा रस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखली जाते. दुसरीकडे, टाइप १ मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा कांदा खाणे फायदेशीर ठरू शकते.

स्ट्रोकचा धोका कमी होतो

कांद्यामध्ये आढळणारे सेंद्रिय सल्फर संयुगे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. यासोबतच रक्तात तयार होणाऱ्या गुठळ्याही सल्फरच्या मदतीने कमी होतात. त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. जर तुम्हाला कांद्यामध्ये जास्तीत जास्त सल्फर कंपाऊंड हवे असेल तर कच्चा कांदा खाणे फायदेशीर असते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

कांदा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत. त्यामुळे हृदयावर कमी दाब पडतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

कॅन्सरपासून बचाव

कांद्यामध्ये क्वारॅक्टिन नावाच्या घटकाचा आहारात समावेश केल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होण्यापासून बचाव होतो. दुसरीकडे, कांदा कर्करोगास कारणीभूत घटकांच्या अॅक्टिव्हीटींना प्रतिबंधित करण्यास मदत करतो. जे शरीराला कर्करोगाशी लढण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो

मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये संसर्गाचा धोका अधिक असतो. कांदा खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या कार्य करते. याचे कारण म्हणजे कांद्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्स, जे संसर्गापासून संरक्षणात्मक थर तयार करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

कसे खावे कांदे

कांद्यामध्ये असलेले संयुगे ते कच्चे खाल्ल्यावरच शरीरावर जलद प्रभाव दाखवतात. तुम्ही कांद्याचा अर्क किंवा रस काढून पिऊ शकता. कांद्यामध्ये असलेल्या सल्फर कंपाऊंडचे फायदे मिळवण्यासाठी शिजवलेल्या कांद्यापेक्षा ते कच्चे खाणे फायदेशीर ठरते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग