मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tips: सुटलेले पोट कमी करण्यासाठी खा या ६ गोष्टी, नॅचरल पद्धतीने विरघळेल चरबी

Weight Loss Tips: सुटलेले पोट कमी करण्यासाठी खा या ६ गोष्टी, नॅचरल पद्धतीने विरघळेल चरबी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 23, 2023 11:18 AM IST

Diet Tips: व्यस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे शरीरावर अतिरिक्त चरबी वाढू लागते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. याला सामोरे जाण्यासाठी पोषणतज्ञांनी काही गोष्टी खाण्याचा सल्ला दिला आहे.

चरबी कमी करण्यासाठी फूड
चरबी कमी करण्यासाठी फूड

Food For Fat Loss: व्यस्त जीवनशैली आणि खराब आहारामुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. वाढत्या वजनामुळे लोकांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, टाइप २ मधुमेह, पक्षाघात यांसारख्या अनेक समस्यांचा धोका असतो. अशा परिस्थितीत लोक वजन कमी करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. अशा परिस्थितीत न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अशाच काही वैज्ञानिक खाद्य पदार्थांबद्दल सांगितले आहे, जे शरीरात आधीपासूनच असलेली चरबी जाळण्यास मदत करतात.

तज्ज्ञांनी सांगितले फॅट लॉससाठी सायंटिफिक फूड

ताक

ताकामध्ये कॅलरीज कमी असतात. या प्रकरणात ते वजन कमी करण्यास मदत करतात. ताक भूक शांत करते, म्हणून तुम्ही दुपारी ताक पिऊ शकता.

मूग डाळ

मूग डाळ प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहे, ती खाल्ल्याने कोलेसिस्टोकिनिन नावाचेभूक शमन करणारे हार्मोन वाढते. जे तुम्हाला जास्त काळ पोटभर राहण्यास मदत करते. यासोबतच, डाळींमधील प्रथिनांचा थर्मिक प्रभाव पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक सुपरफूड बनवतो.

चिया सीड्स

चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कारण त्यात फायबर आणि प्रोटीन असते. या बिया जास्त काळ पोट भरण्यास मदत करतात. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, त्यामुळे ते वजन नियंत्रणात मदत करतात.

फुलकोबी

फुलकोबीमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाणही चांगले असते. हे वजन कमी करण्यासाठी योग्य आहे. शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर त्याचा आहारात समावेश करू शकता.

नाचणी

नाचणी देखील चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते. यामध्ये प्रोटीन आणि फायबर असतात, जे भूक कमी करण्यास मदत करतात. यासोबतच ते वजन कमी करण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel