मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cardiac Arrest: अनुपमा फेम नितेश पांडेची कार्डियाक अरेस्टने निधन, जाणून घ्या उन्हाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी
उन्हाळ्यात हृदयाची काळजी घेण्यासाठी टिप्स
उन्हाळ्यात हृदयाची काळजी घेण्यासाठी टिप्स

Cardiac Arrest: अनुपमा फेम नितेश पांडेची कार्डियाक अरेस्टने निधन, जाणून घ्या उन्हाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी

24 May 2023, 21:45 ISTHiral Shriram Gawande

Healthy Heart Tips: अभिनेता नितेश पांडे यांचे निधन झाले आहे. मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या.

Tips to Keep Heart Healthy in Summer: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका म्हणजे कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगितले जात आहे. अनुपमा या मालिकेत नितेश अनुज कपाडियाचा मित्र धीरज कपूरची भूमिका साकारत होता. रिपोर्ट्स नुसार ते नाशिकजवळ त्याच्या आणखी एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होता. तेव्हाच त्यांची प्रकृती जास्त बिघडली. यापूर्वी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात हृदयविकाराचा झटका हा कलाकारांच्या मृत्यूचे कारण ठरला आहे. नितेश सारख्या दुर्घटना टाळण्यासाठी, उन्हाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी ते येथे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

उन्हाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त घाम येतो. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होते. ज्यामुळे हृदयाभोवती पंप करणे कठीण होते. ही समस्या टाळण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

किती पाणी प्यावे

रिपोर्ट्सनुसार तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल तर दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्या. स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचे रस, ताक, दही यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

शारीरिक हालचाल आहे आवश्यक

उन्हाळ्यात शारीरिक हालचाली करणे थोडे कठीण असते. परंतु उष्णतेनुसार तुम्ही पोहणे, हायकिंग आणि बाइकिंग यांसारख्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ शकता. या अॅक्टिव्हिटी करताना आपल्या मर्यादा लक्षात ठेवा. तुम्हाला हृदयाची समस्या असल्यास कोणतीही क्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दारूपासून दूर राहा

उन्हाळ्यात जास्त मद्यपान केल्याने सुद्धा नुकसान होऊ शकते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होते. जेव्हा अल्कोहोल जास्त प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा रक्तदाब झपाट्याने वाढतो. ज्यामुळे हृदयाचे ठोके देखील वर- खाली जाऊ शकतात. अशा स्थितीत तुमच्या हृदयाच्या स्नायूंनाही नुकसान होऊ शकते.

योग्य प्रकारचे कपडे

प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केले जातात. पण फॅशनच्या या जगात लोक ट्रेंडनुसार कपडे घालतात. स्लिम दिसण्यासाठी लोक घट्ट कपडे घालतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. उन्हाळ्याच्या काळात सैल फिटिंगचे, लाइट रंगाचे कपडे घालणे योग्य आहे. उन्हापासून डोळे आणि डोके सुरक्षित ठेवण्यासाठी चष्मा आणि स्कार्फ सोबत ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)